यवतमाळ सामाजिक

नकली पोलीस बनून वाटसरूस ला लुटले

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

नकली पोलीस बनून वाटसरूस ला लुटले

१लाख १५ हजाराचे सोने घेऊन आरोपी फरार

सोमवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान मोहनलाल धनराज गांधी वय ७० वर्ष रा.म्हाडा कॉलनी प्रताप नगर वर्धा हे आपल्या शेतातून वर्धेकडे जात असताना देवळी येथील तुळजाई मंगल कार्यालय समोर दोन अज्ञात व्यक्तीने आम्ही पोलीस आहे असे भासून १लाख १५ हजार रुपयांचे फिर्यादींचे सोने घेऊन फरार झाले अशी तक्रार फिर्यादी मोहनलाल गांधी यांनी देवळी पोलीस स्टेशनला दिली.

हकीकत याप्रमाणे आहे की वर्धा निवासी मोहनलाल गांधी हे आपल्या दुचाकीवरून यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातून वर्धेकडे जात असताना देवळी येथील वर्धा यवतमाळ रोड तुळजाई मंगल कार्यालय जवळ दोन अनोळखी इसमांनी पिवळ्या रंगाच्या दुचाकी बुलेट वाहणाने येऊन फिर्यादीला थांबविले आम्ही पोलीस आहे गावामध्ये समोर दंगे सुरू झाले आहे तुमच्या जवळील दागिने काढून घ्या असे फिर्यादीला सांगितले व त्यांच्या जवळील गळ्यात असलेली सोन्याची चैन व लॉकेट १५ ग्रॅम तसेच ७ ग्रॅमची सोन्याची अंगुठी घेऊन आरोपींनी एका कागदी पुडीत बांधून दिली. फिर्यादी गावासमोर येतात त्याला असे कोणतेच दंगे झालेले दिसले नाही त्यामुळे फिर्यादीने घाबरून ती पुडी बसस्थानक जवळ उघडून बघितली असता त्यामध्ये २ लहान गोटे निघाले हे सर्व बघून फिर्यादीच्या लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे तोपर्यंत वेळ निघून गेली होती ४०, हजार किमतीची अंगठी १५ ग्रॅम ची ७५ हजार रुपये किमतीची चैन एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा सोने घेऊन आरोपी फरार झाले होते. फिर्यादीने तत्काळ देवळी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली यावरून देवळी पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

Copyright ©