यवतमाळ सामाजिक

विदर्भ आर्थो सोसायटीच्या अध्यक्षपदि डॉ. अनुप कोठारी

विदर्भ आर्थो सोसायटीच्या अध्यक्षपदि डॉ. अनुप कोठारी

वर्ष 2022- 23 करीता यवतमाळ येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अनुप कोठारी यांनी दिनांक 11 जून रोजी नागपूर येथील लि मेरीडियन हॉटल मध्ये पदग्रहण समारंभात अध्यक्ष पदाची शपथ घेतली.

यवतमाळ येथील डॉ अनुप कोठारी यांनी यापूर्वी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अविरोध अध्यक्षपद् मिळविले होते या पदग्रहण समारंभात डॉ. कोठारी सोबत डॉ. अमोल पाटील नागपूर यांनी सचिव पदाचे पादग्रहण केले . या समारंभाचे अध्यक्ष पद डॉ. डी.डी. तन्ना मुबंई व विशेष अतिथी डॉ. सुधीर बाभुळकर नागपूर व डॉ. अशोक गावसकर चेन्नई यांनी भुशविले.

 

पद स्वीकारताना डॉ.कोठारी यांनी सर्वांचे आभार मानले व संस्थेसाठी तन – मन – धनाने सर्वसेवा देण्याचे आश्वासन उपस्थिताना दिले. डॉ. तन्ना यांनी रुग्णांसाठी नवनवीन उपचारपद्धती अंमलात आणण्याचे सुचविले. डॉ. कोठारी यांचे अभिनंदन डॉ. राजेंद्र चांडक, सौ.गाडगे, डॉ. सावजी तर मावळते अध्यक्ष डॉ. धोपावकर , डॉ. गाडेगोने चंद्रपूर, डॉ. काळे , डॉ. लाहोटी, डॉ. सज्जल मित्रा , डॉ. सूमेध चाैधरि, डॉ. राजेन्द्र अटल, डॉ. फडके व यवतमाळ येथील अस्थिरोग तज्ञ व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले .

या ठिकाणी फक्चर न जुळणे यावर विशेष चर्चा सत्र झाले. या कार्यक्रमाचि सांगता डॉ. अमोल पाटील सचिव यांनी आभार प्रदर्शन करून झाली. यवतमाळ नगरीत डॉ.अनुप कोठारी यांचि अध्यक्षपदि निवड झाल्याबद्दल सर्व मान्यवर नागरिकांनी शुभेच्या दिल्या.

Copyright ©