Breaking News यवतमाळ

लाडखेडच्या तरून युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यु

लाडखेडच्या तरून युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यु

तिन दिवस मृत्युशी झुंज . अखेर प्राणज्योत मावळली

रेल्वे कर्मचाऱ्यांचा रेल्वेतून पडून मुंबई येथे मृत्यु

दारव्हा तालुक्यातील् मौजा लाडखेड येथील तरून युवक मृतक नामे निरंजन नारायन लभाने ३4 वर्ष याचा मुंबई येथे रेल्वेमधुन पडून मृत्यु झाला . दि . 10 – 6 – 2023 . ला तो मुंबई येथुन घरा कडे येणे साठी रात्री 11 वाजताच्या दरम्यान झानेश्वरी एक्सप्रेसने येत होता . त्याच दरम्यान ठाणे ते कल्यान दरम्यान त्याचा तोल जावून गेट मधुन खाली पडला . रेल्वेतील प्रवाशांनी आरडाओरडा करून गाडीची चैन ओढुन गाडी थांबवण्यात आली . रेल्वे पोलीसांनी तब्बल तीन तासाच्या शर्यतीनंतर तो दहा ते पंधरा किलोमीटर च्या अंतरावर जखमी अवस्थे मध्ये पडून दिसला . त्याला मुंबई येथील स्वॉयीन दवाखाण्या मधये तात्काळ भर्ती ही केले . परंतु अखेर तीन दिवस मृत्यु शी झुंज देत अखेर निरंजन ची प्राण जोत दि . 13 . ला .विझली . डोक्याला गंभीर दुखापत . हातापायाला ईजा आणि अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यु झाला असावा असा कयास आहे .

निरंजन हा रेल्वे मध्ये वडीलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागला होता . तो सध्या चांदुर रेल्वे येथे गँगमन या पदावर कार्यरत होता . मृतक निरंजन हा दवाखान्याच्या कामासाठी मुंबई येथे गेला होता .

गावा मध्ये तो सर्वाचाचा प्रिय असल्याने त्याच्या जाण्याने गावा मध्ये शोक व्यक्त केल्या जात आहे . त्याचे पच्छात . दोन भाऊ शरद . आणि हरिष असा आत्तपरिवार असुन आज दि.15 ला लाडखेड येथील स्मशानभुमी मध्ये त्याचा अंतिम विधी पार पडला .

Copyright ©