यवतमाळ राजकीय

आम आदमी पार्टी ची स्वराज्य सवाद सभा

आम आदमी पार्टी ची स्वराज्य सवाद सभा

यवतमाळ तालुक्यातील वरझडी या गावी दि.12 जून 2023 रोजी सायंकाळी 08 : 00 वाजता यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख यांच्या अध्यतेखाली यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर, य. ता. उपाध्यक्ष ओंकार चव्हाण, य. ता. उपाध्यक्ष प्रियंका शेळके, य. ता. ओ बी सी आघाडी अध्यक्ष सौ नंदा अंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य संवाद सभा घेण्यात आली. यावेळी यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना आम आदमी पार्टी ने पंढरपूर ते माथेरान पर्यंत काढलेल्या 10 दिवसाच्या स्वराज्य यात्रे चा उद्देश समजवून सांगितला व लोकांना आम आदमी पार्टी सोबत जुळण्यास प्रोत्साहित केले. यावेळी वरझडी येथील (आप ) चे कार्यकर्ता उल्हास भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©