Breaking News यवतमाळ

कागदोपत्री ग्रामसभा दाखवून ठराव केला पारीत वाटखेड ग्रामपंचायत चा अफलातून कारभार 

कागदोपत्री ग्रामसभा दाखवून ठराव केला पारीत वाटखेड ग्रामपंचायत चा अफलातून कारभार 

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाटखेड येथील सरपंच सचिव व सदस्य यांनी महिला ग्रामसभा घेतल्याचे दर्शवून स्वस्त धान्य दुकान संदर्भातील ठराव यवतमाळ तहसीलदार याना देण्यात आला सविस्तर वृत्त असे की वाटखेड येथील कोणत्याही प्रकारची सार्वजनिक ठिकाणी नोटीस सूचनाफलक कुठल्याही प्रकारची दवंडी गावात देण्यात आली नाही आणि सरपंच सचिव व सदस्य यांनी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबाबत ठराव तहसीलदार योगेश देशमुख यांच्या नावे सुपूर्द करण्यात आल्याची घटना या ठिकाणी घडल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले.येथील महिला ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन ग्रामसभा दाखवल्याचे नमूद करण्यात आले आहे येथील रास्तधान्य दुकान वाटखेड येथील संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेला मंजूर दुकान रद्द करण्याचा ठराव देण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली वाटखेड येथील शासनाच्या वतीने स्वस्त राशन धान्य दुकान मंजूर करून जाहीरनामा काढण्यात आला त्या संदर्भात आजवर वाटखेड येथील ग्रामपंचायत नि कुठलीही महिला ग्रामसभा न घेता परस्पर रित्या सरपंच उपसरपंच व सदस्य आणि सचिव प्रमोद धवसे यांनी ग्रामसभा दाखवून स्वस्त धान्य दुकानाचा मंजूर करण्यात आलेला जाहीरनामा रद्द करण्यात यावाअसा ठराव देण्यात आल्याने प्रचंड रोष वेक्त करण्यात येत असून याप्रकरणी नुकतीच तक्रार करण्यात आली आहे याची शासनानी दक्षता घेऊन येथील सचिव सरपंच व सदस्य यांनी खोटी ग्रामसभा दाखवल्याने याची चौकशी करून त्यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी संगम बहुउद्देशीय संस्थेने केली आहे

Copyright ©