यवतमाळ सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनी विविध उपक्रम यशस्वी

जागतिक पर्यावरण दिनी विविध उपक्रम यशस्वी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्प फाउंडेशन च्या वतीने चौसाळा टेकडी परिसर स्वच्छता मोहीम यशस्वी

नऊ दहा अकरा जून म्हणजेच शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात संकल्प फाउंडेशन संकल्प वनिता वहिनी संकल्प आपुलकी, युनिटी फाउंडेशन जाणीव एक हात मदतीचा या सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून चौसाळा टेकडी परिसर वलगतचा वनविभागाच्या क्षेत्रातील जंगल परिसर तीन दिवसात स्वच्छ करून तब्बल प्रिंट ट्रॅक्टर व दोन घंटागाडी भरून घन कचरा संकलित करण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटलांचा समावेश होता सोबतच प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिकचे सुद्धा निर्मूलन करण्यात आले याकरिता संकल्प फाउंडेशन च्या व्यतिरिक्त आणि वनविभाग व नगर प्रशासनाने आपले मोलाची भूमिका बजावली, जनतेला यापुढे संकल्प फाउंडेशनच्या वतीने आव्हान करण्यात आले की आपण ह्या परिसरात येताना निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा परंतु प्लास्टिकचा वापर टाळावा व केल्यास त्याची विल्हेवाट स्वतः लावावी कशा प्रकारचे कायदेशीर पालक करण्यासंबंधीचे फलके वनविभागाने लावावी अशी विनंती करण्यात आली, या परिक्षेत्राकरिता पोलीस विभागाने लक्ष घातल्यास काही अंशी विघातकृत्यांना आळा बसू शकतो अशा पद्धतीचे निवेदन लवकरच मा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना संकल्प फाउंडेशन च्या वतीने देण्यात येईल अशी माहिती संकल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार यांनी दिली

Copyright ©