यवतमाळ राजकीय

आम आदमी पार्टी ने भाजपा सरकार चा राज्य स्तरावर निषेध केला – केंद्रात असलेल्या भाजपा सरकारचा अध्यादेश असंविधानिक

आम आदमी पार्टी ने भाजपा सरकार चा राज्य स्तरावर निषेध केला – केंद्रात असलेल्या भाजपा सरकारचा अध्यादेश असंविधानिक

दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ची सरकार स्थापन झाल्यावर केंद्रामध्ये असलेल्या भाजपा सरकारने राज्य सरकारच्या विरोधात अध्यादेश काढला. यां अध्यादेशानुसार दिल्लीचे प्रशासन हे राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणार नाही व प्रशासनावर राज्य सरकारचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहणार नाही. दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ची सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे कायदे अमलात आणल्या गेले. देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी शिक्षण, आरोग्य सेवा, वीज, पाणी, महिलांना व जेष्ठ नागरिकांना प्रवास तसेच इतर सुख सुविधा मोफत केले. हे जनतेच्या हिताचे कार्य करण्यात भाजपा सरकार अडथळा आणत आहे. केंद्रात असलेल्या भाजपा सरकारच्या यां धोरणामुळे देशाची प्रगती होण्यावर अंकुश बसला असून भाजपा सरकारचे हे वर्तन लोकशाहीची हत्या करणारे आहे. त्या करीता आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा / शहर / तालुका तर्फे दि 11/06/2023 रोजी संविधान चौक यवतमाळ येथे भाजपा सरकारचा निषेध केल्या गेला. हा निषेध कार्यक्रम पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष भाई अमन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके, शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर व तालुका अध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असून तालुका अध्यक्ष मोबीन शेख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून यां कार्याला सुरुवात केली. यावेळी यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर यांनी उपस्थित करायकर्त्यांना तसेच समस्त यवतमाळकरांना केंद्रातील भाजपा सरकारच्या अध्यादेशाचा निषेध करण्याचे जाहिर आवाहन केले. या ठिकाणी जिल्हा सचिव एड मनीष माहुलकर, जिल्हा संगठन मंत्री विलास वाडे, अतुल झोपाटे, प्रियंका शेळके, किरण सोनपिंपरे, अश्विनी उगले, ज्योती मरसकोल्हे, लता शेलारे, राजू धामणकर, ओंकार चव्हाण, निरंजन मेश्राम, नागेश्वर भुते, शत्रुघन आडे, संजय निनावे, ऋषीं नथवानी, चंदन मजेठीया, जानराव टिकले, विलास नोमुलवार, शुभम मेश्राम, आकाश चमेडिया हे उपस्थित होते.

Copyright ©