महाराष्ट्र सामाजिक

पावसाळा आधी वादळी वाऱ्याने अनेकांचे घराचे उडाले छत

देवळी ता. प्रतिनिधी सागर झोरे 

पावसाळा आधी वादळी वाऱ्याने अनेकांचे घराचे उडाले छत

काही लोक जखमी,रस्त्यावर पडले झाड,मोठे नुकसानाचे अंदाज

देवळी तालुक्यातील भिडी परिसरात अचानकच आकाशात मेघ दाटून येवून मेघ गर्जना सह तूफानी वादळाला सुरुवात झाली यामध्ये अनेकांच्या घराचे छप्पर उडाले व काही जखमी सुद्धा झाले आहेत.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास या परिसरात तूफानी वादळाला सूरवात झाली या वादळात भिडी येथील वार्ड क्रं.२ मधिल वैभव दिघोरे यांचे घरातील ४ महिण्याच्या मूलिसह घरातील परिवार या वादळातून सूखरूप बचावले.तसेच वादळाने त्यांच्या घरासह घरातील धान्य सामूग्रिचे व वस्त्र यांचे मोठे नुकसान झाले हा परिवार उघड्यावरच आला घर कूडामातीचे त्यावर असलेल्या टिन पत्रे पूर्ण पने उडाले घरांचे कूड पडले टिन पत्रे उडालेल्याचा शोध घेत आहेत सध्या हे कुटुंब बेघर झाले आहे तसेच याच वादळामध्ये यशवंत विद्यालयाचे टिनाचे पूर्ण छप्पर उडाले शाळा परीसरात वृक्ष कोलमडून पडली,सूनिल चोरे यांचे घरातील लोखंडी (ग्रिल)खिडकी घरात येवून कोसळली,विद्यूत खांब तार तूटून पडले भिडी -पूलगाव मार्गावर चिंचचे झाड कोसळल्याने हा मार्ग बंद पडला वृत लिहेपर्यत जिवीत हानिचे कोनतिही माहिती आली नसून रत्नापूर,बाभुळगाव काजळसरा येथे मात्र टिनपत्राने व घरावरील दगड डोक्यावर पडल्याने कोमल सूरज खडसे वय ३२ वर्ष रा.काजळसरा, गंभीर जखमी होऊन भिडी येथे प्राथमिक उपचार करून वर्धा येथे हलविण्यात आले.तसेच

काही गंभीर जखमी झाले असून ते भिडी येथे उपचार घेत आहेत.

Copyright ©