महाराष्ट्र सामाजिक

न. प.अंतर्गत येणाऱ्या विकासात्मक कामे निकृष्ट दर्जाचे

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

न. प.अंतर्गत येणाऱ्या विकासात्मक कामे निकृष्ट दर्जाचे

माती मिश्रित वाळूचे होत आहे सर्रास वापर

मुख्याधिकारी व बांधकाम अभियंताचे मौन

देवळी शहरातील मागील अनेक वर्षापासून स्थगित असलेले विकासात्मक कामे मागील दोन-तीन महिन्यापासून सुरू झालेले आहे. संपूर्ण देवळी शहरात सुरू झालेले देवळी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विकासात्मक कामे हे फार निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.या विकासात्मक कामामध्ये सर्रासपणे माती मिश्रित वाळूचे सर्रास वापर होत असून असे निदर्शनास येत आहे.परंतु याकडे न.प.मुख्याधिकारी सौरभ कावळे व बांधकाम अभियंता राजेश ढोले यांनी या विकासात्मक होत असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे डोळे झाकपणा करीत आहे त्यामुळे बांधकाम ठेकेदारांचे मनोबल वाढलेले दिसत आहे ते सर्रासपणे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरत आहे.

आता पावसाळ्याचा मुर्ग नक्षत्रात प्रवेश झालेला आहे आणि आता पावसाला सुरुवात होणार आहे आणि अजून विकासात्मक कामे अर्धवट झालेली आहे त्यामुळे भविष्यात पावसाळ्यामध्ये नागरिकांना या अर्धवट कामाची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते यात काही शंका राहिली नाही.काळा पूल परिसरातील विकासात्मक काम, वर्धा-पुलगाव रोडवरील विकासात्मक काम,केदार लेआउट मधील विकासात्मक काम,हे सर्व कामे अर्धवट झालेले आहे ठेकेदार आपल्या मर्जीनुसार काम करीत आहे त्यांच्यावर आता नगरपरिषद अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही.

प्रतिक्रिया

ठेकेदाराला मुख्य अधिकाऱ्यांचे अभय

सध्या देवळी शहरांमध्ये न.प.अंतर्गत सुरू असलेल्या विकासात्मक काम एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे. परंतु मुख्य अधिकारी सौरभ कावळे हे नागरिकांना लहान लहान नियम सांगून त्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक देतात त्यांना देवळी शहरात सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम त्यांना दिसत नाही का त्यांनी बांधकाम ठेकेदारांवर इतकी दया भाव का दाखवत आहे याची शासनाने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी मी अशी शासन दरबारी विनंती करत आहे.

श्याम महाजन माजी नगरसेवक न. प. देवळी

ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण नाही.

सध्या देवळी न.प.वर प्रशासकाचे राज्य आहे सध्या तिथे निवडून दिलेले जनप्रतिनिधी नाही त्यामुळे ठेकेदार मनमानी कारभार करत आहे अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर न.प.बांधकाम अभियंता व मुख्याधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे परंतु असे काही होतांना दिसत नाही अशा निकृष्ट दर्जाच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने चौकशी करून कारवाई करावी.

किरण परिसे देवळी जिल्हा स्वयोजोक आम आदमी पार्टी

Copyright ©