यवतमाळ सामाजिक

बोरी अरब मंडळा मध्ये शासन आपल्या दारी

बोरी अरब मंडळा मध्ये शासन आपल्या दारी

यवतमाळ.बोरीअरब तालुका दारव्हा येथे आज दि.07.जून 2023 बूधवार रोजी ,,शासन आपल्या दारी,, शिबिर आयोजित करण्यात आले होते.नागरीकांना शासनाच्या सर्व विभागांच्या योजनेची माहिती गावातच उपलब्ध व्हावी तसेच दैनिक कामासाठी लागणारे सर्व विभागाचे विविध दाखले जसे राशन कार्ड, उत्पन्नाचे दाखले,7/12, फेरफार उतारे , आधार अपडेशन इत्यादी दाखले गावातच एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने,,शासन आपल्या दारी,, हा उपक्रम सुरू केला आहे.शिबीराचे माध्यमातून सर्व नागरिकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शासन योजनेसाठी दाखले करून देण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित श्री.विठठल कुमरे तहसीलदार दारव्हा यांनी मार्गदर्शन करून शासनाच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.तसेच या शिबिरात सर्व नागरिकांनी आप आपले दाखले करून घ्यावे असे आवाहन केले या शिबिरा मध्ये श्री.राजीव शिंदे , गटविकास अधिकारी दारव्हा यांनी मार्गदर्शन केले तसेच शिबीराची प्रस्तावना श्री.दिपक मनवर मंडळ अधिकारी.बोरिअरब मंडळ यांनी केली.शिबीराचे यशस्वीतेसाठी तलाठी डि.आर .विर , धनराज राऊत, जगदिश निंभेकर,किरण राठोड, प्रिंयका येईलवाड यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©