यवतमाळ सामाजिक

तिवसा येथे दारूची खुले आम् विक्री

तिवसा येथे दारूची खुले आम् विक्री

लाडखेड पोलिसांकडून दारू विक्री करणाऱ्या कारवाई करण्यास टाळाटाळ

राशन कृती समिती,राष्ट्रीय ग्राहक हक्क आयोग,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा सचिव बंजारा शिक्षण संस्थाचे मुख्यमंत्र्यांना तक्रार

तिवसा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या दारू विक्री होत आहे.दारू विक्रीच्या व्यवसायामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून त्या महिला बचत गटाच्या ही सदस्य आहेत. गावात व आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असताना पोलिसांकडून कुठल्या प्रकारची कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे संबंधीची चौकशी करून कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजेश राठोड यांनी तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रधान सचिव श्री मिलिंद म्हैस्कर – उत्पादन शुल्क यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यातील मौजा तिवसा हे पाच हजार लोकसंख्या वस्तीचे गाव आहे.त्या गावातील १२ ते १५ लोक अवैध दारू विक्री करतात.परंतु दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या कडून चिरी मिरी घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्या मुळे अवैध दारू व्यवसाय व जुगार यांना अभय, संरक्षण दिले गेले आहे.त्यामुळे गावातील युवापिढी, तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे.अवैध दारूची विक्री आजूबाजूचा बोरगाव, चानी, नारकुंड, बोरजई गावातही दारू विक्री केल्या जाते

तिवसा गावातील अवैध दारू व्यवसाय खुले आम् सुरू आहे असतानाही पोलीस या कडे ढुंकूनही पाहत नसल्याचे सांगण्यात येत आहे तरी गावातील सुरू असलेल्या अवैद्य व्यावसाय त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे

Copyright ©