यवतमाळ सामाजिक

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी मदत निधी वितरित

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी मदत निधी वितरित

शासन निर्णय जारी

मार्च व एप्रील २०२३ आणि ऑक्टोबर २०२१ कालावधीतील नुकसानीसाठी मदत

पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळ, दि ८ जुन जिमाका:- सन २०२१ या कालावधीत तसेच मार्च व एप्रिल २०२३ या कालावधीत जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा शासन निर्णय ५ जुनला जारी करण्यात आला आहे. यावतमाळ जिल्ह्यातील एकुण ३९ हजार ३६३ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५४ लक्ष १४ हजार रुपये नुकसानीसाठी मदत निधी मंजुर झाला आहे. सन ऑक्टोबर २०२१ चा निधी प्रलंबित होता यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून शासनाने मदत निधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

सन ऑक्टोबर २०२१ या कालावधीत गारपिट व अवेळी पावसामुळे शेतीचे व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी पालकमंत्री यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यात ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मदत देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, पुसद, उमरखेड, आणि पांढरकवडा या चार तालुक्यात २६ हजार ८३३ शेतक-यांचे २२,७८२.१० हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाने २२ कोटी ८० लक्ष ४ हजार रुपये नुकसान मदत निधी दिला आहे.

तालुका बाधित क्षेत्र. शेतकरी संख्या रक्कम

दारव्हा ४५००.१०. ६६२४ ४५१.८४

पुसद ५९१८.०० ११३३५ ५९१.८०

उमरखेड ११४०.०० २५३३ ११४.००

पांढरकवडा११२२४ ६३४१ ११२२.४०

एकुण २२,७८२ २६,८३३ २२८०.०४रु

तसेच मार्च व एप्रिल २०२३ मध्ये गारपिट व अवकाळी पावसामुळे यवतमाळ, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाभुळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा या १३ तालुक्यात नुकसान झाले होते. यात भाजीपाला, उन्हाळी ज्वारी, तीळ या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एकुण १२५३० शेतक-यांचे ५६९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी नुकसानासाठी शासनाने मदत म्हणुन ९ कोटी ७४ लक्ष १० हजार रुपये निधी मंजुर केला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व तहसिलदारांना प्रचलित नियमानुसार शेतपिकाच्या नुकसानीकरिता ३३टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच शेतक-यांना रोखिने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत निधी देऊ नये, मदतीची रक्कम बॅंक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बॅंकेने कोणत्याही प्रकारची वसुली न करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Copyright ©