Breaking News यवतमाळ

दिव्यांग कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तनूक प्रशासकीय अधिकाऱ्याकडून अश्लील शिवीगाळ

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

दिव्यांग कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तनूक प्रशासकीय अधिकाऱ्याकडून अश्लील शिवीगाळ

यवतमाळ:- वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविध्यालंय व रुग्णालंय येथील दिव्यांग कर्मचारी नामे लक्ष्मण त्रीपतीवार हे कॅश जमा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारि यांच्या कार्यालयात गेले असता असभ्य वर्तनूक देत अश्लील शिवीगाळ केली ज्या मुळे प्रशासकीय अधिकारी एस पी झिंजे आणी लक्ष्मण त्रीपतीवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला लक्ष्मण त्रीपतीवार हे एक दिव्यांग कर्मचारी असून त्यांची शरीरिक प्रकृती बेताचीच असते त्यात आपल्या अधिकार्याची असली असभ्य वर्तनूक याचा दबाव लक्ष्मण त्रीपतीवार यांच्यावर पडल्याने त्यांचा बी पी वाढला व त्यांना सेवच्या ठिकाणी कार्यरत असताना चक्कर आली व त्यांना तात्काल डॉक्टरांकडे उपचारास नेण्यात आले.दिनांक 07 जून 2023 रोजी लक्ष्मण त्रीपतीवार यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्याकळून होत असलेल्या त्रासा बाबत अधिष्ठाता यांच्या कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती प्रशासकीय अधिकारी एस पी झिंजे हे या पदावर बऱ्याच वर्षापासून कार्यरत असून याची कारकिर्दी नेहमीच वादग्रस्त असल्याची चर्चा सुरू आहे

Copyright ©