यवतमाळ सामाजिक

हिवरी सर्कल मधील पशुधनाच्या चोरीत वाढ ग्रामीण पोलीस चोरांची करताहेत पाठराखण

हिवरी सर्कल मधील पशुधनाच्या चोरीत वाढ ग्रामीण पोलीस चोरांची करताहेत पाठराखण

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी,मंगरूळ,बेलोरा वाई परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात चोरी जात असल्याने नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरातील गाई,बैल, गोऱ्हे सतत चोरी जात असून चोरून नेणारे संशयित असतानाही पोलीस तपास करीत नाही,विशेष म्हणजे रुई येथील कत्तल खाना असून रात्री ला चोरी जाणारे पशुधन अचानक गायब कसे होते,एक तासा नंतर तपास केला असता वाहन सापडत नाही,तर परिसरातील मोकाट असलेले जनावरे हि दिसे नासे झाले आहे अशीच घटना वाई येथील राम विजय टाले यांच्या मालकीची गाय 5 जून ला चोरी गेली,तर मारोती नागो पेटकर यांची एक गाय त्याच दरम्यान चोरी गेली या बाबत तक्रार केली असता बिट जमादार कैलास लोथे हे फिर्यादीचीच उलट तपासणी करीत फिर्यादी ला सल्ले देत दिशाभूल करीत असल्याने या सर्कल मधील नागरिक त्रस्त झाले आहे अनेक घटना अशा आहे की यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येणारे फिर्यादी शी जणू काही ते आरोपी असल्याचे जाणून घेत असल्याचे अनेक फिर्यादी कडून सांगण्यात येत आहे ग्रामीण पोलीस स्टेशन हे सध्या हे चुकीचे मार्गदशने केंद्र झाले असल्याचे सांगण्यात येत आहे याची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देऊन सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©