यवतमाळ सामाजिक

घर नोकरी सांभाळून रोहिणी बनली सहाय्यक नगर रचनाकार

घर नोकरी सांभाळून रोहिणी बनली सहाय्यक नगर रचनाकार

चूल आणि मूल या चौकटीपर्यंतच मर्यादित असलेल्या महिला आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे येथील रोहिणी पुरी( गिरी )या महिलेने देखील नुकत्याच जाहीर झालेल्या एम पी एस सी च्या निकालात घवघवीत यश संपादन करून सहाय्यक नगररचनाकार पदावर मजल मारली आहे घर पॉलीटेक्निक कॉलेजमधील प्राध्यापिकेची नोकरी,घर परिवार अशा जबाबदाऱ्या सांभाळत पतीच्या साथीने रोहिणी यांनी यशाला गवसणी घातली रोहिणी यांची जिद्द आणि चिकाटी निश्चितच प्रेरणादायी आहे आधुनिक युगात जगत असताना आजही अनेक महिलांना संघर्ष करावा लागत आहे महिला आणि पुरुष हा भेद अजूनही समाजातून दूर झालेला नाही याची अनेक उदाहरणे आहे उच्च शिक्षण घेऊन देखील लग्नानंतर इच्छा असतानाही महिलाना घरातील चौकटीतच अडकून राहावे लागत आहे मात्र उच्चशिक्षित पत्नीला शासकीय सेवेत उच्च पदावर नोकरी मिळावी यासाठी साथ देणारे पती आणि परिवार रोहिणी फ्लश पुरी( गिरी) यांचे माहेर यवतमाळच असून गतवर्षी अमरावती येथील फ्लॅश राजेंद्र पुरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला फ्लॅश पुरी हे यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे रोहिणी यांची शिक्षण बोर्ड मध्ये झाल त्या यवतमाळतीलच पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये प्राथमिक प्राध्यापिका म्हणून जॉब करतात लग्नानंतर त्यांची नोकरी सुरूच होती त्यांना पति अथवा सासर यांनी कोणतीही अडचण अथवा मज्जाव केला नाही उलट रोहिणी यांचे अधिकारी होण्याची इच्छा पाहून त्यांना फ्लॅश सह कुटुंबीयांनी साथ दिली घर नोकरी सांभाळताना महिलेची चांगलीच दमचक होते रोहिणी यांनी यांचा सामना करावा लागला एमपीएससी परीक्षेचा अभ्यास कसा आणि कधी करायचा याची नियोजन करताना रोहिणी यांना अनेक अडचणी येत होत्या घर व नोकरीमध्ये अभ्यासाला वेळ देणे अशक्य होते परंतु फ्लॅश यांनी पत्नीची होत असलेली तारांबळ लक्षात घेत साथ दिली त्यानंतर रोहिणी यांनी एमपीएससीच्या परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन केले या निकालामध्ये रोहिणी यांची सहाय्यक रचनाकार पदी निवड झाली त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे रोहिणी यांचे वाडवडील दीपक अशोक गिरी शासकीय कंत्राटदार तर आई आशागिरी स्वर्गीय देवराव पाटील शाळेमध्ये सुपरवायझर आहेत रोहिणी यांची आजोबा अशोक रघुनाथ गिरी डॉक्टर आहे उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या रोहिणी यांनीही सहाय्यक नगर रचनाकार पदापर्यंत पोहोचून वारसा जपला आहे यामध्ये त्यांना पतीचा मुलाची साथ मिळाली विजय गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले पतीच्या सहकार्यामुळेच या पदावर निवड होऊ शकल्याचे रोहिणी यांनी सांगितले

Copyright ©