यवतमाळ सामाजिक

संतोष गायकवाड बीएसएफ जवानाचे उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल -पाथ्रड (देवी) वासियांनी केले जल्लोषात स्वागत

संतोष गायकवाड बीएसएफ जवानाचे उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल -पाथ्रड (देवी) वासियांनी केले जल्लोषात स्वागत

ग्रा.पं.पाथ्रड (देवी) सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकाने केले त्यांचे स्वागत.

दारव्हा.. म्हणतात ना “स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास”..

आज प्रसिद्ध साहित्यिक ना सि.फडके यांचे शब्द आठवतात..

आयुष्यात आपल्याला सुद्धा समाजाचं काहीतरी देणार असतं याचा प्रत्यय पाथ्रड (देवी)

येथील भूमिपुत्र संतोष गायकवाड याने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये.. कार्य करत असताना उत्कृष्ट देश सेवा केली परिणामी बऱ्याच ऑपरेशन मध्ये सुद्धा त्यांचे उत्कृष्ट कार्य बघून त्यांच्या अनेक सन्मान सुद्धा झालेत आणि बघता बघता आज सुमारे 22 वर्ष पाच महिन्याची अविरत सेवा करून सेवानिवृत्ती झाली.. ग्रामपंचायत पाथ्रड (देवी) मध्ये श्री.संतोष गायकवाड यांना पुष्पहार व शाल घालून यांचा सत्कार करण्यात आला.आणि यानंतर घरी परतत असताना संपूर्ण ग्रामवासी एक वाटले आणि त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावामध्ये पाथ्रड (देवी) जय जगदंबा माता मंदिराचे दर्शन घेऊन संतोष गायकवाड याची डि.जे लावून मिरवणुक व भव्य फटाक्यांच्या आदेशबाजीसह रॅली काढण्यात आली. संध्याकाळी ह.भ.प.रमेश दुधे महाराज आळंदीकर यांचे किर्तन होते. आणि त्याचा मोठा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या.. एवढा सन्मान बघून कळत नकळत त्यांच्या डोळ्यातून सुखद अश्रू निघाले.. आणि डि.जे लावून रॅलीमध्ये गाडीत बसून सर्वांना हात उंचावून अभिवादन करताना वेगळाच आनंद ग्रामस्थांना वाटला. ‌ संतोष नारायण गायकवाड यांची पत्नी सुद्धा गावातील पोलीस पाटील या पदावर असून त्यांचे कार्य सुद्धा उत्कृष्ट आहे.. त्याच्या आई वडिलांचे सुद्धा जल्लोष स्वागत केले.अशा या महान सुपुत्राला.. त्याच्या कार्याला त्रिवार प्रणाम… देश सेवा करून गावी परत आल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी आनंदाचे वातावरण त्यांच्या कुटुंबासह जल्लोष स्वागत केले. आणि गावातील नागरिकांनी त्यांना पुढील आयुष्य आनंदात जावो म्हणून भर-भरून शुभेच्छा दिल्या.

अशाच काही सुंदर सेवानिवृत्ती मनोगत

माणसाचे आयुष्य हे एका खेळासारखे आहे. प्रत्येक पायरीवर ते कठीण होत जाते तसेच मजेशीरही होते. आयुष्याचा प्रत्येक टप्पा माणसाला नवीन अनुभव देतो. लहानपणापासून ते म्हतारपणापर्यंत हे अनुभव आपल्याला मिळतच जातात.

असाच आयुष्याच्या खेळाचा एक टप्पा म्हणजे सेवानिवृत्ती. आयुष्याचा हा टप्पा माणसाला खूप काही शिकवतो. ज्या कामासाठी आपण आपले पूर्ण आयुष्य वाहिले ते काम आता कायमचे सोडायचे ह्या विचाराने देखील जीव गुदमरून जातो.

पण सेवानिवृत्ती दिवशी आपल्या जिवलगांच्या तसेच सहकाऱ्यांच्या सांत्वनाने व शुभेच्छांनी मनाला थोडा आधार भेटतो. अशाच काही सुंदर सेवानिवृत्ती शुभेच्छा हे आम्ही ह्या लेखात दिले आहेत. जे तुमच्या नातेवाईकांना, जिवलगांना, कुटुंबातील व्यक्तींना आधार देतील.

Copyright ©