यवतमाळ सामाजिक

कृषी केंद्र चालकाचा पत्रकारांना खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न

कृषी केंद्र चालकाचा पत्रकारांना खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न

आज झालेल्या पत्रकार संघटनेच्या तातडीच्या सभेमध्ये आपल्या संघटनेच्या दै. लोकमत, दै. देशोन्नती व दै. पुण्यनगरी च्या वडकी प्रतिनिधींविरोधात ” वडकी कृषी केंद्र चालक संघटना’ यांनी पैश्याची मागणी केल्याचा व खोटे वृत्त प्रकाशित केल्याचा आरोप प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला, त्या आरोपाचे खंडन करून या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून लावलेले खोटे आरोप सिद्ध न झाल्यास पत्रकारांवर लावलेल्या आरोपबद्दल संबंधित कृषी केंद्र संघटनेचे पदाधिकारी व चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन आज दिनांक ८ जून २०२३ ला तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच ठाणेदार वडकी यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश शेंडे, उपाध्यक्ष, उपाध्यक्ष मनोहर बोभाटे, प्रा. अशोक पिंपरे, मोहन देशमुख, फिरोज लाखाणी, महेश भोयर, प्रमोद गावरकर, मंगेश चवरडोल, शंकर जोगी, दिपक पवार, गणेश गौळकर, विशाल मासुळकर, गजेंद्र ठुणे, गुड्डू मेहता, सचिन राडे, शालीक पाल, प्रवीण लोढे सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.

Copyright ©