यवतमाळ राजकीय

अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा

दिग्रस प्रतिनिधी 

अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा

के टी जाधव यांच्या नेतृत्वात निघालेल्या भव्य निषेध मोर्चात

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावातील अक्षय भालेराव या तरुणांची निर्गुण हत्या करून खून करण्यात आला होता त्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलने होत आहे त्याच अनुषंगाने आज दिनांक 7 जून रोजी के टी जाधव सर यांच्या नेतृत्वात दिग्रस तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढून दिग्रस तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अक्षय भालेराव या तरुणांनी आयोजित करून भव्य दिव्य स्वरूपात काढण्यात आली होती त्याचाच राग म्हणून काही समाजकंटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का काढली म्हणून त्याचा बदला घेत एका कार्यक्रमांमध्ये तिडके या परिवारासह अनेकांनी त्याच्यावर हमला चडवून चाकू तलवारीनी वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलने होत आहेत त्याच धर्तीवर दिग्रस मध्ये सुद्धा के.टी.जाधव सर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून मोर्चा रुपी आंदोलन उभे केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली दिग्रस शहरातील मुख्य रस्त्याच्या मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी, तसेच या कुटुंबाचे आणि या घटनेतील साक्षीदारांचे संरक्षण करणे. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून सहा महिन्याच्या आत न्याय देणे, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करणे सोबतच अक्षय भालेराव यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचणाऱ्या तसेच यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींची मालमत्ता जप्त करणे ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची कठोर अंमलबजावणी करून यांना फाशीची शिक्षा देणे.गावात अल्पसंख्यांक असणाऱ्या बौद्ध समाजाला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवानगी देणे आरोपींना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर 302 व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सह आरोपी करणे अशा विविध मागण्या घेऊन आज समस्त बौद्ध बांधव आणि बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा च्या माध्यमातून निषेध व्यक्त केला

Copyright ©