महाराष्ट्र सामाजिक

वनमंत्र्यांच्या निवासस्थानावर आक्रोष मोर्चा

वनमंत्र्यांच्या निवासस्थानावर आक्रोष मोर्चा

बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचा ईशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ : आदिवासी समाजाच्या भूमिहिन लोकांनी महसूल आणि वनविभागाच्या पडित जमिनीवर शेती अतिक्रमीत केली आहे. दरवर्षी जमिनीची मशागत करुन जिवानाश्यक जिन्नसाची पेरणी करुन उदरनिर्वाह भागवितात. परंतु, वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात अडथळा व त्रास निर्माण होत आहे. याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी बिगर ७/१२ शेतकरी संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चा ९जून रोजी काढण्यात येणार आहे. असा ईशारा नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

 

अनुसूचीत जमाती पैकी आदिवासी समाजाच्या भुमीहिण लोकांनी महसूल आणि वन विभागाच्या पडीत जमीनीवर शेती प्रवेजनासाठी अतिक्रमीत केली आहे. दरवर्षी जमीनीची जिवनाश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात. मशागत करून दरवर्षी प्रमाणे यावर्षी मशागत करून सन २०२३ च्या खरीप हंगामात पेरणीची तयारी करण्याकरीता गेले असता, वन विभागाकडून मोठया प्रमाणात अडथळा होत आहे. कळंब तालुक्यातील फासे पारथी समाजाच्या महिलांना मारझोड करून वहिती जमीनीवर खड्डे खोदले. तसेच झरी तालुक्यातील बाळापुर येथील वहिती पेरणी लाईक जमीनीवर खड़े खोदून जमीन निष्कासीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर सन २०२३ च्या खरीप हंगामात पेरणी केली नाही आदिवासी तथा फासे पारधी समाजावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोदलेले खड्डे बुजविण्यात यावे. अन्यथा बिगर ७/१२ शेतकरी संघटनेच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या चंद्रपुर येथील निवास्थाना समोर दि. ९ जुन २०२३ रोजी आक्रोष मोर्चा काढण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. निवेदन देताना विलास पवार, प्रफुल इंगोले, भास्कर भगत, दशरथ यनगंट्टीवार यांची उपस्थिती होती.

Copyright ©