यवतमाळ सामाजिक

शंकरलाल कोठारी विद्यामंदिराचा १००% निकाल

शंकरलाल कोठारी विद्यामंदिराचा १००% निकाल

यवतमाळ : शंकरलाल कोठारी विद्यामंदिराचा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला असून एकूण 16 विद्यार्थी 90% च्यावर गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेआहेत. महाराष्ट्र राज्य परिक्षा परीषद पूणेद्वारे लागलेल्या इयत्ता १० वीच्या निकालामध्ये प्रथम गुप्ता हा विद्यार्थी विद्यालयातून ९५.२०% प्राप्त करुन प्रथम आला. द्वितीय पवन राऊत ९४.८० व भार्गवी राऊत ९४.८०% तर धारिणी राणे ९४.६०% गुण प्राप्त करुन विद्यालयातुन तृतीय, श्रेयशी सिदड ९३.८०% ,राशी हरीहर ९३% हे अनुक्रमे चवथा व पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

तसेच कृतिका सुडके९२.८०%,प्रजोती पारधी ९२.६०%,नेत्रा बुल्ले९२.८०%, भक्ती तन्रा ९१.८०%, हर्ष दंडे ९१.८०%, श्रेयस गज्जलवार९१.८०%, खुशी बोरीकर ९१.६०, नेहा अत्राम ९१.४०%, नमोदी मेंढे ९१.२०%, जय मुणोद ९०.६०% मिळवून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहेत.

सर्व विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत पास होत १००% निकालाची परंपरा कायम ठेवली. श्री सेवा शक्ती प्रतिष्ठानाचे सचिव श्री अनुप कोठारी, तसेच कार्यकारी मंडळ, शाळा समितीचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना कोठारी, , पर्यवेक्षक सौ वैशाली चांडक तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उज्ज्वल भविष्याची कामना केली.

Copyright ©