महाराष्ट्र सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

वनीकरण विभागाच्या उपक्रम

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती” या संत वचनाला अनुसरून जल जंगल जामीन माती आणि पाणी या सर्व नैसर्गिक साधनाने संरक्षण करण्यासाठी वृक्षवल्ली सामाजिक वनीकरण विभाग वर्धा परिक्षेत्र देवळी च्या वतीने भिडी येथील आधूनिक रोपवाटिका व भिडी-कोल्हापूर मार्गा वरील श्रीक्षेत्र कोटेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लूचे,रोहिणी ग्रा.पं.सरपंच अजय खडसे सामाजिक कार्यकर्ते राजू वाटाणे,मेहर शैलत, कोटेश्वर देवस्थानचे विरेंद्र देशपांडे,गूनवंत झोपाटे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला वनीकरण विभागाचे मंगेश हांडे तांत्रिक अधिकारी ,राजू गिरी वनपाल, मयूरी सोपले वनरक्षक,सागर तेलंग ,अमोल नगराळे,यांनी सहकार्य केले

Copyright ©