यवतमाळ सामाजिक

प्रत्येक तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न 

प्रत्येक तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न 

महिला व बाल विकास विभागांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या मांडण्याकरिता त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा उद्देशाने मा. ना. मंगलप्रसाद लोढा मंत्री, महिला व बाल विकास मंत्री यांचे संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर राबविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील दि. २४ मे २०२३ ते ०१ जून २०२३ ते ०१ जून २०२३ या कालावधीत जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये समाधान शिबिराचे मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्या स्टॉलवर त्यांच्या समस्या नोंदवून घेण्यात आल्या काही समस्यांचे निराकरण करण्यात आले व त्यांना इतर योजनांची माहिती देखील देण्यात आली. सर्व तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख / कर्मचारी शिबिरास उपस्थित होते. महिलांना समस्या मांडण्याकरिता विहित नमुन्यामध्ये फॉर्म देखील उपलब्ध करून देण्यात आले होते.

प्रत्येक तालुक्यामध्ये तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, आगर व्यवस्थापन, शिक्षण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, संरक्षण अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, विधी सेवा प्राधिकरण, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व तालुक्याचे इतर बऱ्याच विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

शिबिरामध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४९८४ महिलांनी सहभाग घेतला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिलांकडून एकूण १५१५ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ४८४ तक्रारींचे शिबिरातच निराकरण करण्यात आले. इतर समस्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया संबंधित विभागाकडून सुरु आहे.

दारव्हा व नेर तालुक्यामध्ये मा. ना. संजयभाऊ राठोड, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ , वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थित राहून सर्व महिलांना मार्गदर्शन केले. कळंब तालुक्यात मा. आ. अशोक उईके यांचे उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुकानिहाय झालेल्या या शिबिरामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास), कार्तिकेयन एस. सहा. जिल्हाधिकारी, कामिनी कालवी सहा. जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी (सर्व), प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा, तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्याधिकारी, संरक्षण अधिकारी, पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. श्री प्रशांत थोरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) जि.प. यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर यशस्वी करण्याकरिता तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी, मुख्य सेविका पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, बचत गट व इ. कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वांचेच सहकार्य या शिबिरास लाभले. असे प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गजानन जुमळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

Copyright ©