यवतमाळ शैक्षणिक

कोणत्याही खासगी शिकवणी वर्गात न जाता युट्युब वर अभ्यास करून मिळविले 95% गुण

दिग्रस उपसंपादक 

कोणत्याही खासगी शिकवणी वर्गात न जाता युट्युब वर अभ्यास करून मिळविले 95% गुण

दिग्रस येथील ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी रागिनी दीपक काळे हिने नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये 95 टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे रागिनीने कोणत्याही प्रकारची ट्युशन न लावता केवळ युट्युब वर वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या सरांचे ऑनलाईन क्लास बघून वर्षभर चिकाटीने अभ्यास केला व घवघवीत यश संपादन केले. भविष्यात मेडिकल सायन्स चा अभ्यास करून मोठे डॉक्टर होण्याचे स्वप्न रागिनेने व्यक्त केले. तिच्या यशाबद्दल ती सर्व श्रेय आपल्या आई-वडिलांना देते. सर्व स्तरावरून रागिनीचे कौतुक केल्या जात आहे.

Copyright ©