यवतमाळ सामाजिक

शासना आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत हिवरी येथे भव्य शिबिर 

शासना आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत हिवरी येथे भव्य शिबिर 

योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी याची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी डॉ. योगेश देशमुख तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिवरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध योजनांचा फायदा येथील सर्कल मधील सर्वसामान्यांना देण्यात आला त्यामध्ये श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,उत्पन्न प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, असे एकूण 287 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले शासन आपल्या दारी प्रकल्प अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा हिवरी येथे करण्यात आले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे नायब तहसीलदार संजय गांधी विभाग सुनंदा राऊत मंडळाधिकारी जगदीश जयस्वाल मंडळअधिकारी नितीन खरोडे तलाठी रवींद्र डवले धीरज पत्रे प्रशांत गुल्हाने योगेश आडे सुजाता मनवर, माधवी नवरखेले इत्यादी तलाठी प्रामुख्याने उपस्थित होते तर हिवरी येथील सरपंच रंजना भगत, उपसरपंच अभिजीत म

मुरखे, सदस्य अनंत राऊत पोलीस पाटील दिगाबर शहारे व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.तर येत्या दोन दिवसांत आधार कार्ड नुतणीकरणं,नविनी आधार याचे शिबिर घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी गोळे यांनी केले.

Copyright ©