Breaking News यवतमाळ

सरपंच सचिवांवर निलंबनाची टांगती तलवार

सरपंच सचिवांवर निलंबनाची टांगती तलवार

तिवसा यवतमाळ तालुक्यातील तिवसा हे गाव सध्या सरपंच यांच्या भ्रष्टाचाराने ग्रासले असुन वारंवार गावकरी तसेच ग्रा.प.तिवसा येथील सदस्यगण हे कार्यवाहीची मागणी वरिष्ठ अधिकारींकडे सतत पाठपुराव्यासहित करीत असतात.सरपंच नरेश वामन राठोड यांचा वर्षभरातील कार्यकाळामध्ये सुमारे १८ लक्ष रुपयाचे भ्रष्टाचार सरपंच नरेश वामन राठोड यांनी केले आहे असे उपसरपंच अभिजीत राठोड यांनी माध्यमांसमोर बोलताना माहिती दिली.याच पार्श्वभूमीवर ग्रा.प.सदस्य सुभाष वसराम चव्हान यांनी सदर झालेला घोटाळा संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती यवतमाळ यानी विस्तार अधिकारी समवेत चौकशी समितीने नेमून ग्रा.पं.तिवसा येथील कसुन चौकशी केली. चौकशीदरम्यान सरपंच नरेश वामन राठोड याने ६,४५,६८०\- रुपयाचा अपहार करत भ्रष्टाचार केलेला आहे असे चौकशी अहवालामध्ये स्पष्ट नुमुद असुन सदर प्रकरणाचा अवलोकन केले असता सरपंच नरेश वामन राठोड व सचिव पिलावन दोषी असल्याचे आढळून येते आहे, त्यामुळे सरपंच नरेश राठोड नियमाप्रमाणे जबाबदारी निश्चित करुन महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५१ चे कलम ३९(१) पदरिक्त करनेबाबत चा प्रस्ताव सरपंच नरेश वामन राठोड व सचिव पिलावन यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणेकरिता वरिष्ठ अधिकारी कडे सादर करण्यात आले असुन सरपंच नरेश राठोड यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे येत्या काही दिवसांतच निलंबनाची करवाही टाळता येणार नाही.

Copyright ©