यवतमाळ सामाजिक

आयुष डॉक्टर असो. तर्फे जांब येथे आरोग्य शिबीर संपन्न

आयुष डॉक्टर असो. तर्फे जांब येथे आरोग्य शिबीर संपन्न

आज दि. 4 जून 2023 रोजी जांब या गावात आयुष डॉक्टर अँड पॅरामेडिकल असो.तर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले…

सामाजिक बांधिलकी बाळगता आयुष डॉक्टर अँड पॅरामेडिकल असो.तर्फे जनतेच्या आरोग्यात होणाऱ्या बिघाड व त्यांवर होणारे उपचार याचा बोझा अत्यंत काठीन परिस्थितीत सांभाळून आपलें उदरनिर्वाह करतात… अश्यात आयुष डॉक्टर असो. च्या डॉक्टर्स यांच्या संयुक्त निर्णयाने मा. डॉ. विनोद देशमुख -उपाध्यक्ष महाराष्ट्र व मा. माणिकराव घोडाम साहेब यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर घेण्यात आले तसेच ह्या ठिकाणाहूत अल्पदरात जनतेला आरोग्याविषयी लाभ झाला तसेच हे शिबीर निरंतर चालू असेल त त्याचा फायदा जनतेला नक्कीच होईल.

कार्यक्रमाचे उदघाटन मा. माणिकराव घोडाम-ज्येष्ठ सामाजिक सेवक यांच्या हस्ते झाले.शिबिराचे अध्यक्ष डॉ. विनोद देशमुख साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक कुचेरिया, अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज कवाडे, धामणगाव (रेल्वे ), डॉ. गणेश गवळी, वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. राम पवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रकुमार दूधकोर, वर्धा सरपंचा सौ. सोनाली टिचूकले.. तसेच आयुष चे मेम्बर व शेकडो नागरिक यांच्या उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले… आभार प्रदर्शन डॉ. विवेक चौधरी यांनी केले.

Copyright ©