यवतमाळ सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मानवजातीसाठी प्रेरक – यादव गावंडे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मानवजातीसाठी प्रेरक – यादव गावंडे

पुरस्कार सोहळा व भजन स्पर्धेत महिलांना मिळाला सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मानव जातीसाठी प्रेरक असून त्यांनी आपल्या ह्यायातीत हुंडाबळी सती प्रथा बंद करून देशातील मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांचे संगोपन केले. शिक्षणासह नदी, नाले , तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्व मानव जातीसाठी प्रेरक होते असे गौरवोद्गार ग्राम संवाद सरपंच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यादव गावंडे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील मांडवा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त पुरस्कार सोहळा वितरण व भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार पल्लवी आखरे ह्या होत्या. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने, विस्तार अधिकारी गणेश ढोले, ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस यादव गावंडे, तालुका प्रमुख यादव पवार, पंजाब पुसांडे, पिराजी पवार, अनिल गावंडे, दीनानाथ बाबरे, शिक्षक बाहेकर, सरपंच मनीषा गावंडे, उपसरपंच किरण पवार, सदस्य कविता ठाकरे, अशोक गादेवार, गौतम धवणे, गोवर्धन क्षीरसागर, पोलीस पाटील अमोल गावंडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यामध्ये वंदना बरडे , संगीता मानतुटे, निर्मला आगलदरे, गंगा राठोड, जना साखरकर, रमा सोनुने, अनिता भानावत, सुवर्णा कडू, कविता बारसे, अर्चना राऊत, चारु क्षीरसागर, शांता मात्रे, मेथी रुडे यांचा सत्कार रोख ५०० रुपये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

भजन स्पर्धांमध्ये एकूण २६ महिलांनी सहभाग घेतला होता. एकूण ११ बक्षिसे ठेवण्यात आले असून एकूण ७ हजार ५०० रुपयांची बक्षिसे देण्यात आली. प्रथम बक्षीस निर्मला अंबलडेरे, द्वितीय वनमाला ठाकरे, तृतीय निर्मला ठाकरे, चतुर्थ अन्नपूर्णा गावंडे, पाचवे सरस्वती भिसे ,सहावे विमल कांबळे, सातवे सरला नाटकर, आठवे इंदू राऊत, नववे ललिता राऊत, दहावे चंदा कारणकर, अकरावे कविता बारसे तर प्रोत्साहनपर बक्षीस जना दळवी, कमला कांबळे, सविता चांदणे यांना रोख प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले. तसेच मांडवा येथील शिक्षक बाहेकर यांचे स्थानांतरण झाल्याबद्दल व जिनिंग प्रेसिंग सोसायटी मध्ये अविरोध संचालकपदी अशोक गादेवार यांची निवड झाल्याने त्यांचा यशोचित शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यादव पवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मस्के यांनी मानले.

यावेळी प्रभारी तहसीलदार पल्लवी आखरे, दीनानाथ बाबरे व साई पुसांडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत काजळे, संतोष गोरे, विलास पुसांडे, राजू डोळस, शंकर मात्रे, गणेश अंबुरे, अक्षय डांबरे, सदाशिव डांबरे, रवी तपणे, दिनेश भानावत, ज्ञानेश्वर काजळे, गणेश पुसांडे, प्रशांत धनगर, अक्षय डोळस आदी उपस्थित होते.

Copyright ©