यवतमाळ सामाजिक

सेवेच्या ठिकाणाचा बनवला बाजार

यवतमाळ:- पुरुषोत्तम कामठे

सेवेच्या ठिकाणाचा बनवला बाजार

सेवेच्या नावावर खात आहे मेवा,?आता आम्हाला तूच वाचवरे देवा !

यवतमाळ:-येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय माहाविध्यालयाची व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून इतकी ढासळली की आता रुग्णांना सुध्दा समजून आले की जीव वाचवायचा असेल तर शासकीय सोडून खाजगी रुग्णालय गाठावे लागेल कारण शासकीय रुग्णालयात कुठल्याही प्रकारचा उपचार होने कठीण झाले हे केवळ नावा पुरते, आहे.अपघात ग्रस्त रुग्णांपैकी अनेक रुग्ण नागपूर येथे रेफर केल्या जाते काही रुग्णांचे उपचार होत असताना सुद्धा त्यांना हि रेफर केले जात आहे.येथील जननी शिशुंच्या मृत्यू चा आकडा दिवसेंदिवस वाढतीवरच आहे हे एक मोठी चिंतेची बाब आहे.अनेक रुग्णांना तर 20 रुपयाची चिट्ठी सुध्दा महागात पडत असल्याने,शासकिय नकोरे बा असे म्हणण्याची वेळ आली आहे,कारण तपासनी नंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी पैकी एकही औषध या ठिकाणी उपलब्ध राहातं नाही.रुग्णांनां सर्व औषधी खासगी औषधालयातून विकत घ्याव्या लागते रुग्णालयाचे औषधालंय 24 तासाच्या ऐवजी 8 तासच सुरु ठेवल्या जात आहे त्यातही औषध वाटप करणारे कर्मचारी 9.30 वाजता शिवाय हजर होत नाही.रुग्णालयातील अर्ध्यापेक्षा जास्त डॉक्टर वेतन शासनाचे घेत आहे.परंतु सेवा मात्र आपल्या खाजगी रुग्णालयात देतात लाख रुपयाच्या वर वेतन घेणारे डॉक्टर शासकीय रुग्णालयात साधि एक भेट सुध्दा देत नाही आणि आपल्या जुनिअर ला उपचारा संदर्भात सर्व माहिती msg आणी whatsapp च्या माध्यमातून देऊन त्यानां कामाला लावून देतात येथील डॉक्टरांची वेतानपूर्ती नोकरी झाली असल्याचे बोलल्या जात आहे कारण प्रशासन या होणाऱ्या घटनेला जबाबदार आहे. येथील अधिष्ठाता तसेच जिल्हाधिकारी यांचे तर लक्षच नसल्याने सर्व सामाण्याचे जीव धोक्यात आले आहे, कारण हा सर्व प्रकार प्रभारी अधिष्ठाता मुळे घडून येत आहे.गेल्या काही वर्ष्यांपासून महा तथा रुग्णालयाल हे प्रभारी अधिष्ठाता यांच्याच भरवश्यावर येथील कारभार सुरु असून जो कुणी प्रभार घेईल त्यानेच खाऊन ढोबर आणी … गोबरच केल असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील लोक नेत्यांकडे या गंभीर बाबी कडे लक्ष देण्यास वेळच राहिला नाही कारण प्रत्येकानी आपले सेवक नेमून दिले आहे आणि की एकाने आपल्या कार्यकर्त्याची व्यवस्ता व्हावी या साठी रुग्ण सेवक नियुक्त केले तर दुसऱ्याने आपले आपल्या मतदार संघातील तालुक्या प्रमाने रुग्णसेवकांची नियुक्ती केली व आपल्या मतदार संघातील रुग्णांची व्यवस्था करून घेतली परंतु उर्वरिताचे काय? इतर रुग्णांनी काय करावे हा सर्वात मोठा प्रश्न येथील रुग्णांना निर्माण झाला आहे.तसेच येथील कार्य रत असलेल्या पक्षाच्या या रुग्णसेवकांनी आपली कमाई कशी होईल या साठी नव नवीन शक्कल लढवणे सुरु केलेले आहे. डॉक्टरांशी संगनमत करून कुणाला सुट्टी मिळवून देण्याचे पैसे तर कुणाला भरती करून दिल्याचे पैसे असे अणेक प्रकारे पैसे कमवत असल्याच्या चर्चा परिसरात होत आहे रुग्णालया सारख्या सेवेच्या ठिकाणाला यांनी बाजार बनवून ठेवला आहे. याला आता वाली कुणी दिसत नाही.

Copyright ©