यवतमाळ सामाजिक

सुरक्षा रक्षकाने मिळवून दिली हरवलेली पर्स महिलेचे मोठे नुकसान टळले

यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे

सुरक्षा रक्षकाने मिळवून दिली हरवलेली पर्स महिलेचे मोठे नुकसान टळले

यवतमाळ:-श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविध्यालंय व रुग्णालंय या ठिकाणी उपचारास आलेली महिला नामे वनिता पंजाब वरणे हिची पर्स रुग्णालय परिसरात हरवली असता महिलेनी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षा रक्षक जयपाल चव्हाण यांना माहिती दिली सुरक्षा रक्षकाने तात्काळ आपल्या सहकारी सुरक्षा रक्षक स्वप्नील मुदळकर, अनिल कांबळे,राजेश आडे,अंकुश शिंदे,व शोयेब अली यांना सोबत घेऊन परिसरात सुरु असलेल्या सी.सी टीव्ही कॅमरे तपासण्यास सुरुवात केली तपसनी मध्ये संशयित दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वर्ड क्र 18 मधील महिलेला पर्स सापडली असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून सुरक्षा रक्षकांनी वार्ड क्र 18 मध्ये तपास घेतला तपासामध्ये पर्स सापडलेल्या महिलेचा मुलगा भरती होता विना गोपाल पोचारे असे पर्स सापडलेल्या महिलेचे नावं होते भरती असलेल्या मुलाला विचारल्यास ती महिला घरी जेवणाचा डब्बा आनन्यास गेली असल्याची माहिती दिली फोन वरून संम्पर्क साधून महिलेला पर्स बद्दल विचारणा केली असता महिलेनी पर्स जवळ असल्याचे सांगितले व पर्स घेऊन परत येत असल्याची महिलेनी माहिती दिली महिला परत आल्यावर सुरक्षा रक्षकांनी पर्स मधील सर्व सामग्रीची तपासनी करून पोलीस चौकी या ठिकाणी पर्स महिलेच्या स्वाधीन केली.सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंशा करण्यात येत आहे.

Copyright ©