महाराष्ट्र राजकीय

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाला यश,सर्व कामगार कामावर रुजू

वर्धा प्रतिनिधी :सागर झोरे 

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाला यश,सर्व कामगार कामावर रुजू

आम आदमी पार्टी वर्धा जिल्हा तथा क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटना,वर्धा.

भुगाव येथील कंपनी लाॅयट्स स्टील, उत्तम गालवा कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केल्यामुळे गेल्या बारा दिवसापासून कंपनीतून काढण्यात आले होते, कामगार अधिकारी यांनी कामगार कायदा ३३ चे अनुसार परवानगी न घेता काढलेल्या सुरक्षित कामगार यांना न्याय देणे ऐवजी त्याची पावर नागपूर आयुक्ताडे आहे असे खोटे सांगून दिशाभूल केली असता त्याची कंप्लेंट १९ मे रोजी पक्ष व संघटनेने केली त्यावर जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांनी भेट देऊन चर्चेतुन आज दि.२ जून रोजी मीटिंग आयोजन करून कामगार अधिकारी कौशीक भगत तसेच कंपनीचे बुरांडे आणि कंपनीचे एच आर मॅनेजर वानखेडे यांना नोटीस काढून बोलाविले यामध्ये सुद्धा कंपनीने मर्जीप्रमाणे कोणताही प्रतिनिधी पाठवलेला नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हाधिकारी साहेब फुलझेले यांच्या दालनात सुनावणी दरम्यान आम आदमी पार्टी व संघटना प्रतिनिधी सुरेश रंगारी यांनी भुगाव येथील लाॅयेट्स आणि उत्तम गालवा च्या कामगाराची २०११ ते आज पर्यंत हाताळलेले सर्व प्रकरण सोबत साक्षीदार यांच्या आधारभूत महाराष्ट्र शासन किमान वेतन आणि केंद्रशासन पीएफ धोरण यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार सह अन्य अत्याचार शोषण इत्यादी आधारे जिल्ह्यातील सर्व कामगाराची बाजू मांडली,हे जिल्हाधिकारी साहेबांनी कामगारधिकाऱ्यांना आजच्या रोजनामा मध्ये नोंद करण्यात भाग पाडले ,त्यानंतर उपस्थित अनैतिक कंत्राटदार बुरांडे यांच्या तोंडून अर्थात साक्षी मध्ये कबुली घेतली की कंपनी किमान वेतन पेक्षाही कमी दरात टेंडर काढते आणि टेंडर देत असुन माझ्या शासनाच्या धोरणाची पायमल्ली करते असे जिल्हाधिकारी साहेबांना च्या लक्षात आले तसेच कंत्राटदार यांच्या मते शासन धोरण किमान वेतन ५२० अंतर्गत ठेका देऊन आणि घेऊन मी त्यामधून प्रत्येकाला ३५० रुपये रोजी देतो त्यातूनच पी एफ कपात करतो अशाप्रकारे माझं प्रामाणिक काम सुरू आहे आणि कामगारांना मी कपात केलेलं नाही उलट कंपनीने ठेका रद्द करून दिले ,यादरम्यान गेट पास च्या त्रुटी अभावी कामगारांना कामावर घेण्यात आली नाही असे मत कामगार ठेकेदार यांनी मांडले.यावर साहेबांनी निरीक्षण करून शासनाच्या धोरणानुसार मूळ मालकांनी किमान वेतन देऊन वरील कमिशन तुमच आहे असे म्हटले तसेच या पूर्ण कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे अशे आदेश देत. कामगार अधिकारी भगत यांची कान झडती घेत म्हटले की २०११ पासून या आज पर्यंतच्या किमान वेतन आणि आर्थिक घोटाळ्याची चौकशी का केली नाही , शासनास का कळवले नाही.

संबंधित कामगाराला त्वरित दि.३ जुन पासून कामावर घ्या असे बजावले. रुजू होत असलेल्या कामगारांची नावे,

प्रमोद मुंजेवार,अंकुश वाढवे,विनोद वासेकर,रुपेश मोहुरले,कुणाल नवघरे, कुणाल नेटके,अमर मुंजेवार,सारंग उघडे,भास्कर कुडापे,तेजस गेडाम, कपिल वाडगुळे,मयूर वैभव मोहरले, सुरज महाडोळे,समीर कोटनाक, सौरभ नायक,सागर ढोले,रमेश भालेराव,लोकेश बेले,महेश मस्के उपस्थित असून रुजू झाले,यावेळी आम आदमी पार्टीचे वर्धा शहर अध्यक्ष मंगेश शेंडे,कामगार सेल चे सुरेश रंगारी,जिल्हा सचिव अतुल तिडके,जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले ,शहर कमेटी चे अमर शेंडे,युवा आघाडी चे योगेश ठाकुर,मिडीया सेल चे आसिफ शेख ,शहर उपाध्यक्ष बलराज गुप्ता, शहर कमेटी चे मयुर राऊत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©