यवतमाळ सामाजिक

ईसापुर चे उपसरपंच अपात्र घोषित

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

ईसापुर चे उपसरपंच अपात्र घोषित

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पडले महागात

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशावरून झाली कारवाई

देवळी तालुक्यातील ईसापुर ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली होती यामध्ये अनिकेत वसंतराव निखाडे रा.ईसापुर यांच्या विरोधात गणेश सुधाकर आंबटकर रा.ईसापुर हे दोघेही एकमेकांविरुद्ध ग्रामपंचायत निवडणूक मध्ये लढले होते.सुदैवाने दोघांनाही सारखे मतं पडल्याने ईश्वर चिट्ठीने गणेश आंबटकर हे विजयी झाले.त्यानंतर अनिकेत निखाडेने गणेश आंबटकर यांच्या विरोधात जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली की गणेश आंबटकर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९चे कलम १४(1)(ज -३) अंतर्गत त्यांची ग्रामपंचायत सदस्यता रद्द करण्यात यावी अशी याचिका जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती.जिल्हाधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तहसीलदार देवळी यांच्याकडे हे प्रकरण पाठविले होते.तहसीलदाराने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जिल्हा अधिकारी कार्यालयात सादर केले.तहसीलदाराच्या चौकशी अहवालावरून असे सिद्ध झाले की गणेश आंबटकर यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले त्यानुसार जिल्हाधिकारीने गणेश आंबटकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.

गणेश आंबटकर हे आपल्या वडिलांसोबत घर क्रमांक ११ मध्ये ग्रामपंचायत ईसापुर तहसील देवळी जिल्हा वर्धा येथे राहत होते.त्यांचे वडील सुधाकर रामराव आंबटकर यांनी २०ते २५ वर्षापूर्वी शासकीय जागेवर घर बांधले होते. त्या जागेचे कर नियमित ग्रामपंचायत मध्ये भरत होते.शासनाने आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही सुधाकर आंबटकर यांनी व तिथल्या काही इतर लोकांनी अतिक्रमण नियमित करण्याबद्दल अर्ज दाखल केला होता. शासनाने तिथल्या काही रहिवासी लोकांना पट्टे सुद्धा वाटप केले होते. परंतु सुधाकर आंबटकर यांना पट्टा भेटला नाही त्यानंतर ग्रामपंचायत ची टॅक्स पावती गणेश आंबटकर यांच्या नावाने येऊ लागली त्यानुसार गणेश आंबटकर यांनी १५७५ चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याचे तहसीलदार अहवालात सिद्ध झाले.त्यानुसार दिनांक १ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून तहसीलदाराच्या अहवालावरून गणेश आंबटकर यांची ग्रामपंचायत सदसत्व रद्द करण्याचे आदेश दिले.

Copyright ©