यवतमाळ सामाजिक

चांदापुर ग्रांपचायत कडून महिलांचा सन्मान

चांदापुर ग्रांपचायत कडून महिलांचा सन्मान

ग्रामपंचायत चांदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महिलाना सन्मानित करण्यात आले

शासन निर्णयानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चांदापुर येथील दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार,सन्मानचिन्ह व मानपत्र आणि पुरस्कार स्वरूपात धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपसरपंच वासुदेव जाधव यांनी सांगितले पुरस्कारामुळे केलेल्या कार्याचे शासनाकडून कौतुक झाले त्यामुळे गावातील इतर कार्य व महिला सक्षमीकरनाचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी नक्कीच मदत होईल असे सांगून वासुदेव रतन जाधव उपसरपंच चांदापूर यांनी शासनाचे व माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती यवतमाळ यांचेआभार व्यक्त केले

ग्रामपंचायत चंदापुर येथे सरपंच सरला जाधव , उपसरपंच वासुदेव रतन जाधव व सचिव ग्रामपंचायत ज्ञानेश्वर करडे यांनी महिलांना सन्मानित केले

यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर गावातील नागरिक मान्यवर उपस्थित होते

Copyright ©