महाराष्ट्र सामाजिक

रत्नापूर येथील अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

रत्नापूर येथील अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजसेवी महिलांच्या केला सत्कार

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती रत्नापूर ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माला अर्पण करण्यात आली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नापूर येथील समाजसेवी महिलांचे रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह भेट देऊन समाजसेवी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.या मध्ये शारदा वाघ, पुष्पा गायकवाड तसेच अन्य महिलांचा समावेश होता.या कार्यक्रमाला सरपंच सुधीर बोबडे यांनी आपले मत व्यक्त करताना अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.शासक व संघटक,न्याय प्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर या सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा या महान राजमाता अहिल्याबाई होळकर तसेच पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला अशा या महान स्त्रीला त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन आपले भाषण संपवले.या कार्यक्रमाला उपसरपंच सौरभ कडू,देविदास वाघ,विद्या बाई ठाकरे,सुनीताबाई सडमाके,ग्रामपंचायत सचिव वर्षा खांडेराव,सहारे गुरुजी,आदी नागरिक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Copyright ©