यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिराची सलग दहाव्या वर्षीही १००% निकालाची परंपरा कायम

सुसंस्कार विद्या मंदिराची सलग दहाव्या वर्षीही १००% निकालाची परंपरा कायम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुसंस्कार विद्या मंदिर या शाळेने सलग दहाव्या वर्षीही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत शाळेचा १०० टक्के निकाल देत, शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. कु.ख़ुशी गुगलिया व ईश्वरी नस्करी या विद्यार्थिनींनी ९३. ८०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु. आर्या देवघरे हिने ९२% गुण प्राप्त करून द्वितीय तर कु. हर्षदा रोहणकर हिने ९१% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच मधुरा हर्षे ९०. ८०%, आदित्य बोनगुलवार ८९. २०%, सुमेध वानखेडे ८९.२०%,दिशा देशमुख , पवित्रा देऊळकर व अनुजा राऊत यांनी ८७.६०%,अनुश्री गिरटकर ८७.४०%, भैरवी भोय ८६.४०%, रुजूल राऊत व सोहम सातपुते ८५.६०%, राशी गुगलिया ८४.८०%, मृणाल तंगलपल्लेवार ८४.४०%, गार्गी गुल्हाने ८३.४०%, आर्यन वखरे ८३%, योजित खोडके ८२%, मयुरेश काळे ८१.६०%व आयुष गोखे ८१.२०% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्याबरोबरच भाग्यश्री बजानलवार,आस्था बेंडे,गौरी खेडकर, अंजली महल्ले, सुधांशू अफूने, समिक्षा तळोकार,देवांशू नांदणे, देवर्ष बागवाले,आर्या सरोदे,संकेत गुल्हाने,आयुष राजगुरे, रुद्रेश गावंडे,अथर्व ठाकरे, दैवत महाजन, निनाद खारोल, कुश जाधवानी व सोहम बत्तलवार या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादित करून शाळेची सलग १० वर्षांपासूनची १००% टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे. शाळेने सलग दहा वर्षांपासूनची १०० टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम ठेवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा,उपाध्यक्ष सुनिलजी गुगलीया,सचिव संजय कोचे संस्थेचे सदस्य प्रवीण लुणावत,मनोज लुणावत गणेश गुप्ता, राजेश गुप्ता तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी भरभरून कौतुक केले आहे. शाळेला एका विशिष्ट उंचीवर नेल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत उज्ज्वल यशाबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुसंस्कार विद्या मंदिराच्या उत्तुंग अशा यशाबाबत सर्व स्तरावरून शाळेचे कौतुक होत आहे.

Copyright ©