यवतमाळ सामाजिक

जिद्द असेल तर स्वप्नं साकार होतात

जिद्द असेल तर स्वप्नं साकार होतात

बाल न्याय अधिनियम -2015 अंतर्गत कार्यरत शासकिय निरिक्षणगृह व बालगृह (मुलांचे) यवतमाळ येथे विधिसंघर्षग्रस्त बालकांना पालण-पोषण,सुरक्षितता, शिक्षण, पुनरवसन ईत्यादी उददेशाने बाल न्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यात येते.

विद्यमान न्यायमुर्ती श्रीमती. सुप्रीया लाड, प्रथम न्यायदंडाधिकारी तथा अध्यक्षा बाल न्याय मंडळ, यवतमाळ. यांच्या आदेशाने उच्च शालांत परिक्षेच्या कालावधीत परिक्षा देणारी दोन बालके कायाद्याच्या कचाटयात सापडून दाखल झाली. परंतु त्यांना परिक्षेपासून वंचीत ठेऊ नये या उददेशाने प्रेरित झालेल्या विद्यमान न्यायाधिश यांनी त्यांना परिक्षेला बसण्यास परवानगी दिली. दाखल २ (दोन) बालके ही 12 वी विज्ञान व कला या दोन वेगवेगळया शाखेतून परीक्षा देणार असल्याने या दोन्ही बालकांना नियमित अभ्यास करण्यास प्रोत्साहीत करणे, त्यांच्याकडून अभ्यास करूने घेणे, त्यांचे मनोबल राखणे, योग्य मार्गदर्शन करणे, सर्व शैक्षणिक साहीत्य उपलब्ध करून देणे, वेळप्रसंगी अभ्यासाकरिता स्वतंत्र व्यवस्था करणे याकडे अधिक्षक श्री.गजानन जुमळे यांच्याकडून जातीने लक्ष पुरविण्यात येत होते.

कायदाविरोधी कृत्य करून जीवनाची दिशा भरकटलेल्या दोन अजाण / नाबालीक बालकांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळणावर बारावीच्या परिक्षेत निरिक्षणगृहामध्ये राहून परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करणे ही संस्थेच्या कारकिर्दीतील, बाल न्याय यंत्रणेसाठी यशस्वी व आनंदाची घटना मानावी लागेल. यातुन बालकांच्या हातून झालेल्या घटनेचा विसर पडून चुकीपासून परावृत्त करून एक आदर्श नागरीक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येते. बारावी सोबतच नंतर इ. १० वी ची परिक्षा सुरु झाली त्यामध्ये सुदधा २ (दोन) बालके परिक्षा देणार असल्याने एकाच वेळेस ४ (चार) बालकांना वेळेवर परिक्षेसाठी तयार करून परिक्षा केंद्रावर ने-आण करणे ही जबाबदारी अपुरे मनुष्य बळ व वाहनाची सुविधा नसने या परिस्थितीत अत्यंत जिकिरीची होती. याही परिस्थीतीत त्यांना दोन वेगवेगळया परिक्षा केंद्रावर वेगवेगळया वेळेत ने-आण करणे ही महत्वपुर्ण जबाबदारी / भुमीका संस्थेचे कर्मचारी यांनी आपले कर्तव्य म्हणून नाही तर सामाजिक भावनेतुन निष्ठेने पूर्ण केले. यावर मात करणे करिता शासनाने अशाप्रकारे बोर्डाचे परिक्षेसाठी प्रवेशीत असल्यास स्वंतंत्र परिक्षा केंद्र अथवा विशेष बाब म्हणून स्थानीक परिक्षा केंद्रवार परवानगी दिल्यास परिक्षेपासून एकही बालक वंचीत राहनार नाही.

परिक्षा केंद्र बाहेरगावी असल्याने पोलीस बंदोबस्तात त्यांना नेने आनेन क्रमप्राप्त होते. त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला. परंतु एवढया मोठया कालावधी करिता वाहन उपलब्ध

होणार नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि बालकांना ने-आन करण्याची मोठी अडचण निर्मान झाली. उचीत ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे व बालक परिक्षेपासून वंचीत राहू नये यासाठी संस्था अधिक्षक गजानन जुमळे, समुपेदशक पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. वाहन उपलब्ध झाले नाही. संस्थेला गेल्या वर्षभरापासून अनुदान उपलब्ध नसल्याने प्रवासवर तरतुद उपलब्ध नसल्याने कर्मचारी सुदधा खर्च करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रवास खर्च करणे अतिशय अवघड असतांना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, अविनाश पिसुर्डे व महेश हळदे यांचे सहकार्याने बाल न्याय मंडळा कडील उपलब्ध निधितून तजविज करण्यात आली. त्याद्वारा खाजगी वाहन/ परिवहन महामंडळाने ने–आन करण्याची व्यवस्था करण्यात आली. अडचण सोडविण्यात यश आले. हा खटाटोप एवढयाच साठी की अनंत अडचणी असुन सुद्धा ईच्छा असेल तर मार्ग निघतेाच आणि जिद्द असेल तर स्वप्न साकार होतात.

सदर परिक्षेत विज्ञान शाखेतील व कला शाखेतील बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.प्रशांत थोरात व बाल न्याय मंडळ, च्या प्रमुख न्याय दंडाधिकारी श्रीमती.सुप्रिया लाड सदस्या, श्रीमती.काजल कावरे, सदस्य श्री.राजु भगत व संस्थेचे अधिक्षक, श्री.गजानन जुमळे, प.अधिकारी श्री. राजेंद्र गौरककार, समुपदेश्क श्रीमती.पुजा राठोड , शिक्षक संजय मोटे, क.लिपीक श्री.सुनिल हारगुडे ,काळजी वाहक श्री.मंगेश वाघाडे , अविनाश राउत, आकाश खांदवे, प्रतिक जुमळे यांनी अभिनंदन करून बालकांचे कौतुक केले व पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या.

Copyright ©