यवतमाळ सामाजिक

संभाजी ब्रिगेड चे यवतमाळ येथे टेंबा आंदोलन शहरातील पथदिवे बंद, टेंभा(मशाल)लावून केला निषेध.

 

मुख्य मार्गावरील अनेक पथदिवे बंद.
प्रतिनिधी
यवतमाळ–
शहराला झगमग करणाऱ्या पथदिव्यांचे नेमके झाले का काही दिवे चालू तर काही दिवे बंद असल्याने शहरांमध्ये अपघाताचे व चोरीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद ते नवीन बस स्टँड ते वडगाव रोड परिसरातील अनेक पोलवरील दिवे बंद आहे. तसेच शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असून याकडे लक्ष वेधण्यासाठी खांबावर टेंबे(मशाली) लावून नगरपालिकेला जागविण्या करीता संभाजी ब्रिगेड च्या अनेक कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आहे. दिवे बंद असलेल्या जिल्हा परिषद सामोरिल परिसरातील ठेबे(मशाली) लावून त्यांनी नगर परिषदेचा निषेध नोंदविला.
कर्तव्य दक्ष मात्र कामात नाही लक्ष चे नारे लावून मुख्यधिकार नगर परिषद यांच्या विरोधात नारे लावले व ठेबा आदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील अनेक परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, या मशाल आंदोलनाने हा परिसर उजळून निघाल्याचे रात्री दिसत होते.
यवतमाळ शहरात
अंधाराच्या साम्राज्या मुळे शहरांमध्ये घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे झालेले अर्धवट काम आणि स्वच्छतेची दुर्दशा पाहवयास मिळत आहे.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या या रात्रीच्या टेंबे (मशाल) आंदोलनाने तरी नगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील इतर समस्यांचे निराकरण करावे अशी या शहरातील लोकांची मागणी आहे.या आंदोलनात सहभाग नोंदविला
कैलाश भोयर,सचिन मनावर,शुभम सोंनाकर ,निहार घाडगे, कुणाल बोपचे,सम्यक वाघमारे,जीवन कुंद्रर, नितीन काळे,विकास लासंते,

शहराला कोणी वाली आहे का ?

स्थानिक स्वराज्य संस्थे च्या निवडणूक अद्याप झाले नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हाती शहराचा कारभार असल्याने शहराच्या स्वच्छतेकडे तसेच शहराच्या विकासाकडे स्थानिक प्रशासकाच्या नजरेत येणाऱ्या प्रत्येक बाबी कडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे असते.मात्र स्थानिक प्रशासकाच्या
दुर्लक्ष धोरणां मुळे शहराला कोणी वाली आहे की नाही?, असा सवाल नागरिकांनी केला आहे. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाने या शहरातील समस्यांचे तातडीने निराकारण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सुरज खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यवतमाळ

बॉक्स
शहराच्या सौंदर्यीकरणाकरिता माधुरी मडावी यांच्या कार्यकाळामध्ये अनेक शहरातील मुख्य ठिकाणाचे सौंदर्यकरणाचे काम त्यांनी यवतमाळ नगरपालिकेतील तरतुदी नुसार करून ठेवल्या होत्या मात्र राजकीय दबाव तंत्राचा वापर करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली तडकाफळ करण्यात आली व त्यांनी शहराच्या विकासाकरिता करून ठेवलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम अधिकारी व राजकीय नेत्यांनी केले.
त्यानंतर दादाराव यांच्या कार्यकाळा मध्ये शहरातील विकासात्मक बाबींकडे लक्ष न देता व कुठलीही नवीन विकासात्मक धोरण त्यांनी शहरा करीता आणले नसून शहराचा विकास थांबलेला दिसत आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये झालेल्या सेटिंगची चर्चा सर्वत्र असून यामध्ये झालेल्या घोळ हा उच्च न्यायालया त दाखल याचिकेत त्या प्रकरणाची दस्तावेज व माहिती वरिष्ठांना साधन केल्याप्रकरणी डोलारकर यांच्यावर निलंबनाची कारवाई ची टाकी तलवार असून हा डोलारा शहरातील चर्चेचा विषय झाला आहे.

Copyright ©