यवतमाळ सामाजिक

अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मंजिता शिंदे सन्मानित.

सावळी सदोबा :- आशिफ खान
सावळी सदोबापासुन जवळच असलेल्या आयता या गावात 31 मे बुधवार रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले,
सौ. मंजिता अविनाश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला, गावांमध्ये शांतता राखन्यासाठी सहकार्य करणे, बचत गटांना मार्गदर्शन करणे, कोरोना काळात जनतेला सहकार्य व मार्गदर्शन करणे इत्यादी कामासाठी हा पुरस्कार मंजिता अविनाश शिंदे यांना गावच्या सरपंच श्रीमती मंदाताई विलास मडावी , ग्रामपंचायत सदस्या सुमनबाई ठाकरे , ग्रामपंचायत सदस्या कविता मयूर मुंढे , ग्रामपंचायत सदस्य रमेश कुळसंगे , आयता ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ए. एम. जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी गावात दारूबंदी करीता कार्य करणाऱ्या रमाबाई दत्ता भगत यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ आणि पाचशे रुपये रोख अशा प्रकारचे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला गावातील मंडळी उपस्थित होती.

Copyright ©