Breaking News महाराष्ट्र शैक्षणिक

पुसदचे सय्यद सलमान राष्ट्रीय सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने सन्मानित.

 

भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक बाडकर साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाले

पुसद.
भारतात विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी टी. एम.जी क्रीयेशन सलाम इंडिया मुबंई तर्फे राष्ट्रीय अभिमान पुरस्कार देण्यात येतो यावर्षी २०२३चा सुध्दा पुरस्कार नवी मुबंई वाशी येथील मराठी साहित्य भवन येथे २८ मे रोजी भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनोज बाडकर साहेब यांच्या हस्ते शैक्षणिक कार्यासाठी पुसदच्या सय्यद सलमान सरांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा खूपच देखना होता यात अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कलावन्त उपस्थित होते.या पुरस्कारात सरांनी निवड ही शैक्षणिक ककार्यसाठी करण्यात आली होती सलमान हे स्पर्धा परीक्षेची जनजागृती करतात त्या करीता अवघ्या महाराष्ट्रात मोफ़त स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतात नूकत्याच झालेल्या पोलीस भरतीसाठी सरांनी अनेक ठिकाणी सेमिनार घेऊन मार्गदर्शन केले तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेसाठी जनजागृती तसेच मार्गदर्शन करतात त्यासाठी त्यांनी मराठी भाषा अकॅडमी चॅनल सुद्धा ओपन केला आहे.तसेच सर वर्ग आठवी ते बारावी प्रयत्नच्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात करीअर गाईडन्स सेमिनारद्वारे मार्गदर्शन करतात.  महाराष्ट्र स्टेट बोर्डात उर्दू माध्यमाकरिता हिंदी/मराठी विषया करिता कार्यसुध्दा केले आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या पुर्वी बोर्डाच्या परीक्षा कशी द्यावी ,हिंदी/मराठीचा पेपर कसा लिहावा यासाठी मोफ़त मार्गदर्शन करतात.सोबतच सरांना मराठी भाषेची आवड असल्यामुळे मराठी संत साहीत्यात पि.एच.डी करत आहे आणि त्याद्वारे  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रबोधनसुध्दा करतात व व्याख्याने देतात.हिंदू मुस्लिम एकता, सदभावना, राष्ट्रीय एकात्मतेसाठी अनेक उपक्रम राबवीतात अश्या प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यसाठी आपले योगदान देत आहे.या पुरस्काराची एक विशेषतः ही सुद्धा आहे की, सलमान सरांना फार कमी वयातच हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा महाराष्ट्रातुन आनंद वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©