यवतमाळ राजकीय

बाबासाहेब गाडे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार

प्रतिनिधी

यवतमाळ ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. र.न.१०१०, ता.जि.यवतमाळ येथील निवडणूक सण-२०२३-२८ करिता गाडे पाटील समर्पित पॅनलचा दणदणीत विजय झाला. तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक मध्ये रियाजुद्दीन सेठ म मनलस यांचा अध्यक्ष व विजय तळोकर, उपाध्यक्ष म्हणून सन 2023-28 करिता निवड करण्यात आली.
त्यामुळे मावळते अध्यक्ष देवराव सालोडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन बाबासाहेब गाडे पाटील व डॉ.सूर्यकांत गाडे पाटील यांनी सत्कार केला व अध्यक्ष कार्यकाळातील उत्कृष्ट पणे संस्था चालून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन संस्था उभारणीस न्याय दिला त्याबद्दल आभार व्यक्त करून भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या व नवनिर्वाचित अध्यक्ष रियाजुद्दीन शेठ मनलस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून आपल्या हातून शेतकरी लोकांची संस्था असल्याने योग्य व न्यायोचित शेतकरी हितांचा निर्णय घेऊन संस्थांची प्रगतीत वाढ आपल्या हातून व्हावी करिता बाबासाहेब गाडे पाटील व डॉ.सूर्यकांत गाडे पाटील यांनी मनोगत व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या नवनिर्वाचित अध्यक्षांना संस्थेची प्रगती योग्य मार्गाने करण्याबाबत शेतकरी बांधवांनी या निवडणुकीमध्ये सर्व संचालकाना निवडून शेतकरी बांधवांनी संधी दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचाआभार व्यक्त करण्यात आला.
तसेच इतर सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ मधील अतुल चिलगरवार,गोपाल दोडके,विजय तळोकर,अशोक माळवी,विजय देशकर,अशोक राऊत,रमेश देशमुख,अशोक साळुंखे,प्रमोद पाटील,दीपक जाधव,कल्पना देशमुख यांना सुद्धा संस्थेची प्रगती करण्यास आपणास शेतकरी बांधवांनी संधी दिली त्यामुळे संधीचे योग्य सोने करून संस्थेची प्रगती करून शेतकरी हिताचा विचार करून न्याय देण्यात यावा करिता सर्व संचालक मंडळ यांना शुभेच्छा देण्यात आल्या
कार्यक्रमाचे समारोप गोपाल दोडके यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात
आला.

Copyright ©