यवतमाळ सामाजिक

मोकाट स्वानास ओलावा पशू सस्थाने दिला मायेचा आधार

मोकाट स्वानास ओलावा पशू सस्थाने दिला मायेचा आधार

सध्या यवतमाळ शहरातील मोकाट श्वानाना पिल्लं झालेली आहे. ही पिल्लं कधी गाडी खाली तर कधी आजाराने मरतात. काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की १ ही पिल्लं वाचत नाही. या श्वानाना ना राहायला घर आहे ना त्यांना खायला प्यायला वेळोवेळी मिळते.

 

अश्या प्रत्येक मोकाट प्राण्याान करिता ओलावा पशुप्रेमी संस्था मागिल ३ वर्षा पासुन काम करीत आहे. यवतमाळ शहरातील मोकाट श्वानांच्या पिल्लांना हक्काचे घर मिळून देण्याकरिता ओलावा पशुप्रेमी संस्थे तर्फे मोफत दत्तक शिबीराचे आयोजन २८ मे २०२३ रोजी करण्यात आले होते.

 

या शिबिरात दर्शविलेल्या लोकांची संख्या ही लक्षणीय होती. स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती गोळा करण्याची संधी उपस्थितांना मिळाली आणि त्यांनी फाउंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक सुध्दा केले.

 

दत्तक घेण्यासाठी उपलब्ध 27 कुत्र्यांपैकी 18 कुत्र्यांना प्रेमळ घरे सापडली. तथापि, कार्यक्रमादरम्यान एक चिंता लक्षात आली – लोक मादी कुत्र्यांपेक्षा नर कुत्र्यांना प्राधान्य देत होते.त्यासाठी मादी कुत्र्यांबद्दलच्या या गैरसमजांना संबोधित करणे आणि दूर करणे महत्वाचे आहे. मादी श्वान नर श्वानाप्रमाणेच प्रेमळ, निष्ठावान आणि प्रशिक्षित असतात. ते चांगले साथीदार असू शकतात आणि कोणत्याही कुटुंबात उत्कृष्टपणे राहू शकतात.

 

शेवटी श्वान हे श्वान असतात मग ते नर असो अथवा मादी याचे महत्व ओलावा पशुप्रेमी संस्थेने या शिबिराच्या माध्यमातून लोकांना आणि दत्तक घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. या दत्तक शिबिरात दत्तक घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस परस्पर श्वानाची काळजी कशा प्रकारे घ्यावी त्याचे लसीकरण कशे करायचे याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 

ओलावा पशुप्रेमी संस्थे मार्फत दत्तक श्वानास रेबीज लसीकरण मोफत करून देण्यात आले. या दतक शिबीराचे उद्घाटन ओलावा पशुप्रेमी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आलोक गुप्ता आणि उपस्थीत मान्यवर सुरेश राठी,घनश्याम बागडी यांचा हस्ते करण्यात आले. या शिबिरात दीपक बागडी, डॉ. पुजा कळंबे, तेजस भगत, प्रथमेश पवार,हर्षवर्धन मुद्दलवार,भुषण घोडके, कृष्णा गंभिरे, राजश्री ठाकरे, श्वेता चांडणखेडे, कार्तिक चौधरी, कपिल टेकाम, पवन दाभेकर, मयंक अहिर, कैलाश पटले, आशय नंदनवार, रिया लांडे हि मंडळी उपस्थीत होती.

Copyright ©