यवतमाळ सामाजिक

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्ष,जनतेचे आरोग्य धोक्यात

यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्ष,जनतेचे आरोग्य धोक्यात

यवतमाळ:-येथील अनेक शासकीय कार्यालयात तसेच रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने उपहार गृह व भोजनालये चालवल्या जात आहे.या उपहार गृहाची व भोजनालयातील विक्री होणाऱ्या पदार्थांची सुध्दता, अशुद्धतेची तपासनी ,वापरण्यात येणारे सामग्रीची साफ सफाई,भेसळ व इतर साफसफाई वापरण्यात येणारे गॅस सिलेंडर या सर्व तपासणीची जवाबदार अन्न व औषध विभागाची आहे.परंतु यवतमाळ मध्ये हे विभाग आहे.किंवा नाही हेच कळत नाही अन्न व औषध विभागाकडून न होणाऱ्या तपसानीचा गैर फायदा घेत उपहार गृह आणी भोजनालयात वापरण्यात येणारे साहित्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरत असून ग्राहकांकडून जास्तीत जास्त किंमत वसुल केल्या जात आहे. कंत्राटदार मालक सर्व प्रकारचे नियम धाब्यावर ठेऊन आपली मनमानी कमाई करित आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाने अन्न व औषध विभागाचे अधिकारी हे आपला वाटा घेऊन या कंत्राटदार मालक यांना मनमानी कमाई करन्यास मोकळे सोडले आहे.परंतु याचा भुर्दंड सामन्यांना भराव लागत आहे.आधी या उपहार गृहाला पैसे ध्या आणी नंतर डॉक्टरांना हजरो रुपये ध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री केल्या जाते यात पन्नास टक्के दूध आणि तितकेच,बनावट दूध विकल्या जाते मात्र हा विभाग केवळ पगारा पुरताच दिसून येत आहे,अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्य पदार्थ विकल्या जाते,परंतु हे पाहूनही अधिकारी झोपेतच आहे

Copyright ©