Breaking News महाराष्ट्र

घराच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

घराच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू

आंबेडकर नगर परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ घराच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू झाला.आंबेडकर नगर निवासी संदीप गजानन वाणी वय ४० वर्ष याचा आंबेडकर नगर विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची तक्रार सौ सुनंदा मोरेश्वर तागडे यांनी देवळी पोलीस स्टेशन मध्ये शनिवारी रात्री ९ वाजता च्या सुमारास तोंडी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली आहे.

आंबेडकर नगर परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात नेहमीच जुगार खेळणाऱ्याची तसेच व्यसन धुंद लोकांची गर्दी राहायची आणि तिथेच घराच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू झाल्याने आंबेडकर नगर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू असल्याचे ऐकायला येत आहे हा मृत्यू घात पातही असू शकतो अशी लोकांची चर्चा सुरु आहे.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

Copyright ©