यवतमाळ सामाजिक

यवतमाळ शहरातील पाच दिवस पाणी पुरवठा बंद

यवतमाळ शहरातील पाच दिवस पाणी पुरवठा बंद

यवतमाळ पाणीपुरवठा योजना अमृत अभियानांतर्गत ऑफिस संप ते वाघापूर एमबीआर कडे जाणारी सातशे मिलिमीटर व्यासाची नव ची पाईप लाईन दत्त चौक येथे गळती उद्भवल्याने वाघापूर वरून होणारा पाणीपुरवठा चार ते पाच दिवस बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे 26 मे 2019 रोजी यवतमाळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत ऑफिस संप ते वाघापूर कडे जाणाऱ्या सातशे मिलिमीटर व्यासाची पाईप लाईन वर दत्त चौक येथे गळती उद्भवली आहे या पाईप लाईंचे काम सुरू असल्याने पाण्याची गळती दुरुस्त होईपर्यंत जवळपास चार ते पाच दिवस वाघापूर मुख्य संतुलन टाकीवरून वैभव नगर टाकी वाघापूर टेकडी टाकी, मेडिकल टाकी, बालाजी मंगल टाकी विसावा टाकी, विठ्ठलवाडी टाकी पॉलिटेक्निक टॉकीज व चांदोरे नगर येथील टाकी या उंच पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणीपुरवठा गळती दुरुस्त होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे तरी शहरातील संबंधित भागातील जनतेने सहकार्य करावे अशी आवाहन निखिल कवठाळकर उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्यवस्थापन उपविभाग यवतमाळ यांनी केले आहे

Copyright ©