यवतमाळ राजकीय

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सतिष तायडे तर उपसभापतीपदी प्रभाकर जाधव

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सतिष तायडे तर उपसभापतीपदी प्रभाकर जाधव

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडीचे 18 पैंकी 14 उमेदवार विजयी ठरले होते. आज शनिवार, दि. 27 मे रोजी दुपारच्या सुमारास सभापती व उपसभापती पदाची निवड घोषित करण्यात आली. त्यामध्ये सभापती म्हणून सतिष रामराव तायडे तर उपसभापती पदासाठी प्रभाकर पिरू जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सदर निवड जाहीर केली आहे. यावेळी सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच संचालक मंडळ आणि चाहत्यांकडून माजी राज्यमंत्री देशमुख यांचेही सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लालसिंग राठोड, ऍड. सुधाकर जाधव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर जाधव, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड, किशोर आडे, संजय दुद्दलवार, न. प. माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, माजी नगरसेवक केतन रत्नपारखी, विधानसभा संपर्क प्रमुख यादव गावंडे, तालुका प्रमुख यादव पवार, शहर प्रमुख राहुल देशपांडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रज्योत अरगडे, युवासेना तालुका प्रमुख अक्रम पटेल, प्रकाश राठोड, आसिफ बंगाली, इमरान खान, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक साहेबराव पाटील चौधरी, सखाराम तुंडुलवार, भिमराव खारोडे, गजानन इंगळे, अमित देशमुख, रामेश्वर राऊत, भाईलाल गड्डा, ओंकार खंडलोया, जगदीश नलगे, सौ. आशा प्रकाश राठोड, सौ.धुरपत सुदाम राठोड तथा अनेक शिवसैनिक उपस्थित हते.

Copyright ©