यवतमाळ सामाजिक

कचरा पेटविण्याच्या नादात पेटविली कार

कचरा पेटविण्याच्या नादात पेटविली कार

दत्त चौकातील महाराष्ट्र ब्यांकेसमोरील तिवारी चौकातील लाईन मध्ये जागा असल्याने अनेक चार चाकी वाहने लावण्यात येते मात्र याच चौकातील राहुल नास्ता पॉइंट आहे येथील घान,कचरा याच लाईन मध्ये उघड्यावर फेकण्यात येतो याचेच परिणाम हा कचरा अनेक जनावरे खातात तर काही कचरा राहुल नाष्टा पॉइंट वाले पेटून देतात अशातच २६ मे ला दुपारी तीन वाजता कचरा पेटविल्याने बाजूला उभी असलेली कार क्र. एम एच २८, ए झेड ७०७१बलेनो नी पेट घेतला, ऑटो सेंटर चे संचालक हि बाब अशोक ब्रामटकर यांच्या लक्षात येताच ती पेट घेतलेली कार पाण्याने विझविण्यात आली तर त्याच बाजूला दहा ते बारा वाहने उभी होती अटो सेंटर संचालका च्या समय सूचकते ने मोठा अनर्थ टळला महाराष्ट्र ब्यांके समोरील राहुल नाष्टा चे संचालक हे नित्य नियमाने कचरा गाडी मध्ये न टाकता खुले आम् रस्त्यावर फेकून देतात त्या मुळे या कचऱ्याचा त्रास परिसरातील शेकडो नागरिकांना,दुकानदारांना होत आहे आणि हा कचरा झाडाच्या बुडाला टाकून पेटविल्या जातो असे अनेक झाडे पडली

या प्रकरणी नगर परिषद यांनी दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे असे केल्यास इतर घाण करणाऱ्याना समज मिळेल.

Copyright ©