महाराष्ट्र सामाजिक

अवैध वृक्ष तोड प्रकरणातील कारवाई थंड बसत्यात

देवळी प्रतिनिधी सागर झोरे 

अवैध वृक्ष तोड प्रकरणातील कारवाई थंड बसत्यात

वनविभाग अधिकाऱ्यांचे कारवाई करण्यास टाळाटाळ

देवळी तालुक्यातील वाबगाव या गाव शिवाराला लागून असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील बाबुळगाव पांदण रस्ता,येथील वन विभागाच्या ताब्यातील ९ एकर मधील अवैध वृक्ष कटाई प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई थंड बस्त्यात टाकलेली आहे.

गावकऱ्यांच्या सूचनेवरून अवैध वृक्ष कटाई झाल्याची माहिती वन विभागाला दिली होती.आणि अवैध्य वृक्ष कटाई करणारे आरोपी गावातीलच असणारे त्यांच्यावर कारवाई करणे हे वनविभागाचे काम होते परंतु वन विभाग अधिकाऱ्याने अवैध वृक्ष कटाई चा नुसता पंचनामा करून आरोपींना अभय का दिले आहे?अशी गावामध्ये चर्चा सुरू आहे.आरोपी खुलेआम गावांमधील घुमत आहे व सूचना देणाऱ्यांवर संशय करून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमक्या देत आहे या संबंधित तक्रारही पोलीस स्टेशन देवळी येथे दाखल झालेली आहे परंतु वन विभाग अधिकारी आरोपींना वाचविण्याचे खुलेआम प्रयत्न करीत आहे.अशा आपले कर्तव्य न बजावणारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन अशा अधिकाऱ्यांवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्या परिसरातील नागरिक करीत आहे.

Copyright ©