Breaking News महाराष्ट्र

बोरधरण परीसरातील दारूभट्टी उध्वस्त ,दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट

वर्धा जिल्हा प्रतिनिधी पंकज तडस

बोरधरण परीसरातील दारूभट्टी उध्वस्त ,दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट

सेलू तालुक्यातील बोरधरण परीसरात मौजा बोरी शिवारात बोरनदीच्या तिरावर पोलीसांनी छापा टाकून दारूभट्टी उध्वस्त करून मौक्यावर मोहा सडवा व इतर सामुग्री नष्ट करण्यात आली

बोरी शिवारात नदीतीरावर सुरू असलेल्या या हातभट्टीवर पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता तिथे ६ लोखंडी ड्रम ज्यात उकळता मोहा रसायन ४८० लिटर ५० प्रमाणे २४००० रूपये ५ जर्मन घमेले, ६ भट्टीचे लोखंडी ड्रम, १२ लोखंडी ड्रम कच्चा मोहा रसायनने भरलेले, १२ खाली लोखंडी ड्रम, गावठी दारूच्या तिन प्लास्टिक डीपी १४ प्लास्टिक रिकाम्या डबक्या, जलावू लाकडे व इतर साहित्य असा एकुण २ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तक्रारदार यांचे लेखी तक्रारी वरून सदर गुन्हा नोंद केला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिएस आय पांडुरंग कामठे, पोलिस अंमलदार कृष्णा माने यांनी केली.

Copyright ©