Breaking News यवतमाळ

वन विभागाचा कारनामा,कामे न करताच काढली देयके,एकच मजूर एकाच वेळी दोन ठिकाणी कामावर

वन विभागाचा कारनामा,कामे न करताच काढली देयके,एकच मजूर एकाच वेळी दोन ठिकाणी कामावर

वारजई अंतर्गत चंदन पार्क वनपरिक्षेत्र अधिकारी यवतमाळ यांचे मार्फत कामे न करताच खोटे मजूर दाखवू लाखो रुपयाचा अपहार केल्याचे उघड झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समिती वारजई अंतर्गत चंदन पार्क येथे कोणत्याच प्रकारचे काम न करता समिती अध्यक्ष,सचिव यांनी संगनमत करून लाखो रुपयांची देयके काढली,समितीचे अध्यक्ष यांनी नातेवाइकांचे नावे अनेक पैसे हडप केले येथील समितीने कधीच जमा,खर्चा करीता सभा घेतली नाही,या बाबत इतर सदस्यांना कधीच सूचना,नोटीस दिली नाही.येथील झालेल्या अपहारा बाबत समिती उपाध्यक्ष व सदस्य यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे ज्या व्यक्तींनी चंदन पार्क येथे कोणत्याच प्रकारचे दिवसा अथवा रात्री कामे केली नाही त्या व्यक्तीच्या नावाने पैसे काढण्यात आले त्यामध्ये अध्यक्ष व सचिव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात येथील लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे या कामात अनेक खोट्या मजुरांची नावे समाविष्ट करून त्यांचे नावाने पैसे काढण्याचे स्पष्ट झाले असून येथील समिती काही काळापूर्वीच मुदत संपल्याने ती पुन्हा कार्यरत आहे विशेष म्हणजे वन व्यवस्थापन समितीची कार्यकाळ संपला असल्याने दुसरी समिती गठीत करणे अनिवार्य होते परंतु सचिवांनी असे न करता त्या समितीला हाताशी धरून लाखो रुपयांचा गैरप्रकार करणे सुरू केले आहे या समितीची एकही मासिक सभा झाली नाही तर इतर सदस्यांना विश्वासात न घेता अपहार करण्याचा चक्क धडाका सुरू केलेला आहे याप्रकरणी श्रीमती पूनम गजानन पारधी, रवींद्र लहुजी धारे, हर्षवर्धन देवराव पाटील, रत्नकला शंकर तिवारी, गायत्री भीमराव उमाटे, या सदस्यांनी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सोबतच प्रधान सचिव महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई अपर मुख्य सचिव महसूल, जिल्हा अधिकारी, प्रधान मुख्य सचिव वनसंरक्षक अधिकारी नागपूर मुख्य उपवन संरक्षक यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केल्या आहे याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषींवर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व अपहार केल्याची रक्कम तातडीने वसूल करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे

Copyright ©