यवतमाळ सामाजिक

कारवाई होते नाम मात्र,अजूनही भिंगरी,मटका चालते दिवस रात्र

कारवाई होते नाम मात्र,अजूनही भिंगरी,मटका चालते दिवस रात्र

शहरात पोलिसांनी अनेक अवैद्य व्यावसायिकांवर कारवाई केली मात्र धंद्याची लिंक नाही तुटली, जिथे जिथे कारवाई केल्या गेली तेथील व्यावसायाला पुन्हा तेजी आल्याचे दिसून येत आहे पोलिसांच्या धाडी जनसामान्यांची दिशा भुल करण्याच्या तर नाही ना ,! असा सवाल जनसामान्यांना पडला आहे कारण सर्व सामान्यांच्या खिशाची कात्री मात्र बंद पडली नाही वारंवार वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित झाल्याने पोलिसांना कार्यवाही करणे भागच पडले पण व्यावसाय बंद नाही पडले हि चिंतेची बाब झाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी कार्यवाई केली आणि तीस मिनिटातच यांच्या दुकानदाऱ्या जैसे थे झाल्या , ज्या ठिकाणी प्रति दिवस लाखोंची उलाढाल होत आहे.त्या ठिकाणी पोलिसांनि फक्त काही रुपयांची जप्ती दाखवली,इतका पैसा गेला कुठे हे मात्र कोडच आहे.विशेष सूत्राने दिलेल्या माहिती वरुन या अवैध्य व्यवसाईकाचे कनेक्शन वरिष्ठांशी असल्याचे बोलल्या जात आहे .त्या मुळे या भिंगरी च्या नादात कोण कोणते पोलीस अधिकारी फिरत असावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.तर सध्या मोबाईल मध्ये नवीन गेम आला असून हा गेम पांन टप्री,गाडी मध्ये एखाद्या चौकात दोन ते चार वेक्ति एकाच वेळी खेळू शकते याला लुडौ असे नाव देण्यात आले असून या खेळातही खिशात पैसे ठेऊन हा खेळ खेळल्या जात असल्याचे सर्वत्र चर्चिल्या जात आहे.या खेळा कडेही पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,सहरातील आजही राजरोस पने अवैद्य व्यावसायिक आपला व्यावसाय खुले आम् कसा चालवतो असा सवाल सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे,अनेक ठिकाणी या व्यावासाया मध्ये नवीन पिढी गुर्फटल्या जात असल्याचे दिसून येत आहे तरी पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन शहरातील अवैध्य व्यावसायिकांना वठणीवर आणावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©