यवतमाळ सामाजिक

रानडुकराची शिकार करताना वाघ झाला जखमी

रानडुकराची शिकार करताना वाघ झाला जखमी

टीपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघ कॅमेरात कैद

रखरखत्या उन्हामुळे टीपेश्वर अभयारण्यातील वाघांचा जीवही कासावीस झाला आहे. त्यामुळे हे वाघ पाण्यात डुबकी लावण्यासाठी पानवठयावर येत आहे. पर्यटकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी वाढली आहे. दरम्यान पानवठयावर आलेल्या दोन वाघांपैकी एक वाघ जखमी असल्याची माहिती पर्यटकांना मिळाली आहे. हा जखमी वाघ पर्यटकांच्या कॅमेरात कैद झाला असून वन विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहे.

टीपेश्वर मध्ये दृष्टीस पडत असलेले दोन वाघ एक नर तसेच एक मादी आहे. यातील मादी जातीचा वाघ दोन दिवस पूर्वी रानडुकराची शिकार करताना जखमी झाल्याची माहिती मिळाली. या वाघाच्या मागील पायाच्या मांडीवर जखम झाली आहे. ही जखम जवळपास दीड इंच लांब आहे. रानडुकराची शिकार करतांना दात लागल्यामुळे जखम झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक पर्यटकांनी या जखमी वाघाला आपल्या कॅमेरात कैद केले. सफारी मधील जिप्सी वर कार्यरत गाईड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे टिपेश्वर अभयारण्याचे वन अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी या भागावर लक्ष ठेवून आहे. या दोन्ही बछड्यांना त्यांच्या आईने सोडून दिल्यानंतर आता हे वाघ स्वतः शिकार करत आहे. शिकार करीत असताना वाघ सुद्धा अनेकदा जखमी होत असल्याची माहिती व्याघ्र तज्ञांनी दिली आहे.

Copyright ©